बांधकाम साईटवरून पडून कामगाराचा मृत्यू बांधकाम साईटवरून पडून कामगाराचा मृत्यू बांधकाम साईटवरून पडून कामगाराचा मृत्यू
पिंपरी, ता. १३ : इमारतीचे बांधकाम सुरु असताना खाली पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. तर एक कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना पुनावळेतील कोयते वस्ती येथील केसायर साईट या बांधकाम साईटच्या ठिकाणी घडली.
साहेब कुमारस दास (वय २५) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचे नाव आहे तर राजेश दास हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कुमारेश देवेंद्र दास (रा. लक्ष्मी चौक, मोशी, मूळ - पश्चिम बंगाल) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बांधकाम ठेकेदार सागर फजलर मंडल (वय ४२, रा. पश्चिम बंगाल) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने कामगारांच्या सुरक्षिततेसाठी जाळी लावली नाही. तसेच कामगारांना हेल्मेट न पुरवता सुरक्षिततेच्या दृष्टीने इतरही आवश्यक ती काळजी घेतली नाही. दरम्यान, काम करताना खाली पडल्याने राजेश गंभीर जखमी झाला तर साहेब दास यांचा मृत्यू झाला.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

