चऱ्होलीत तडीपार गुंडाला नऊ किलो गांजासह अटक
पिंपरी, ता. १३ : चऱ्होलीतील दाभाडे सरकार चौकात पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका तडीपार गुंडाला अटक केली. त्याच्याकडून ९ किलो ४७८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.
भरत दशरथ वाघमारे (वय ३९, रा. राहू पिंपळगाव, ता. दौंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमली पदार्थ विरोधी पथक हे दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चऱ्होली बुद्रूक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना दाभाडे सरकार चौकाजवळ एक व्यक्ती दुचाकीवर एक नायलॉनचे पोते ठेऊन संशयीतरीत्या थांबलेला दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
दरम्यान, तो पिंपरी चिंचवड पोलिसांनी तडीपार केलेला आरोपी असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या गाडीची तपासणी केली असता, गाडीवरील पोत्यात गांजा आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ९ किलो ४७८ ग्रॅम गांजा आणि दुचाकी असा एकूण पाच लाख ३३ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी भरत वाघमारे याच्यावर चाकण पोलिस ठाण्यात दोन आणि खडक पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

