शालेय जगत

शालेय जगत

Published on

कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे विद्यालय
कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालय चिंचवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला चौधरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. असलम अली शेख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. मुख्याध्यापक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी व देशासाठी केलेले योगदान याविषयी माहिती देण्यात आली.

जनता शिक्षण संस्था, दापोडी
जनता शिक्षण संस्थेच्या दापोडी येथील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाखेतील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्याचबरोबर शाळेतून प्रभात फेरी काढण्यात आली. ‘‘प्रभात फेरीमध्ये ‘शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ अशा वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे पदाधिकारी मराठी, इंग्रजी माध्यम व वरिष्ठ महाविद्यालयाचे शाखाप्रमुख तसेच सर्व शिक्षक वर्ग सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांना वही वाटप
भगवान महावीर जन्मकल्याणकनिमित्त मोहननगर येथील श्री तुळजाभवानी मंदिर प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात आले. विद्यादान प्रतिष्ठानच्या सोनाली मेहेर, गणेश दातीर पाटील, प्रणाली मेहेर, शुक्रराज होरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ नवकार महामंत्राने झाला. यावेळी सतीश मेहेर म्हणाले, ‘‘भगवान महावीर यांचा संदेश ‘जगा आणि जगू द्या, अहिंसा, क्षमा, परोपकार आचरणात आणा. भाषेतून आपण इतरांशी तर मौनातून स्वतःशी संवाद साधत असतो.’’ सतीश मेहेर यांनी सूत्रसंचालन केले.

सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर
आकुर्डी येथील श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर या शाळेमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक सचिव गोविंदराव दाभाडे होते. माधुरी सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. नयना पाटील, मंगेश अहिरे, अर्पिता शिरढोणे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक राजू माळे उपस्थित होते. अविनाश आखाडे, प्राजक्ता बंडगर, प्रकाश कोळप यांनी सहकार्य केले. प्रियांका वालकोळी यांनी व्यक्त आभार मानले. सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डीचे शिक्षक विनोद भवरलाल गोयर यांनी रंगीत खडूच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र साकारले आहे.

जोग इंग्लिश मीडियम स्कूल
जोग इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंचवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सहशिक्षिका सीमा भडगावकर यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या विषयीचे विचार व्यक्त केले. यावेळी प्रमुख प्राचार्य योगेश बसुदे, रजनी तांबे उपस्थित होते. सोनल दास यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
‘नवनगर शिक्षण मंडळ आकुर्डी ’ संचलित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सिंधूनगर प्राधिकरण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता गुरव, उपमुख्याध्यापक विजय बच्चे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मनीषा जाधव यांनी प्रास्ताविक केले. विजय गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची प्रेरणादायक माहिती दिली. कैलास कोशिरे यांनी सूत्रसंचालन केले. संजय देवरे यांनी आभार मानले.

अराईज इंटरनॅशनल स्कूल,
अराईज इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील
कव्हेकर यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी अराईज इंटरनॅशनल स्कूलचे अकॅडेमिक हेड गणेश पवार, लर्निंग अँड डेव्हलपमेंट हेड सलोनी अग्रवाल, संदीप गावडे, संतोष वदक, सविता आढाव, नीता पाटील, प्रतिक्षा पुरवार, ऐश्वर्या निकुंभ, सौरभ कदम, वैभव भिंगारदिवे, पुष्पांजली मांडेकर, संतोष मानकर, राहुल पाटील, शीतल होनराव उपस्थित होते.

सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला
प्रशालेत भगवान महावीर स्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. संस्थेचे मानद सचिव ॲड. राजेंद्र मुथा व सह सचिव अनिल कांकरिया यांनी श्री महावीर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. नवकार महामंत्र व ओम नमः शिवाय जप करण्यात आला. यावेळी सोनाक्षी गादिया या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. तसेच, स्वाती चोरडिया यांनी महावीरांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली. उपमुख्याध्यापिका सुषमा बंब यांनी महावीर जयंती निमित्त विद्यार्थिनींना भगवान महावीरांची बहुमोल तत्त्वे सांगितली. प्राचार्या सारंगा भारती यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक दीपक थोरात यांनी आभार मानले.

सेठ श्री पन्नालाल लुणकरण लुंकड
चिंचवडच्या प्रांगणात सेठ श्री पन्नालाल लुणकरण लुंकड वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावा उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी मौनसाधक सौरवमुनीजी, सौम्य साधिका, उपप्रवर्तक, डॉ. गौरवमुनीजी, ओजस्वीवक्ता, प्रानिधीजी, सार्थकमुनीजी आणि संप्रज्ञाची यांचे आशीर्वाद लाभले. माजी विद्यार्थी डॉ. गौरव मुनीजी यांनी आयोजित केला होता. त्यानंतर ‘जैनम जयती शासनम’ असा संदेश देणारे ध्वजवंदन करण्यात आले. वसतिगृह कमिटीचे अध्यक्ष ओस्तवाल यांनी आभार मानले. सोनाली ललवाणी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com