...थांबा, विचार करा, मार्ग निघेल
पिंपरी, ता. १५ : जीवनात चढ-उतार असतातच. किरकोळ अथवा कितीही गंभीर कारण असले तरी त्यावरून आत्महत्या करून जीवन संपविणे हा उपाय नाही. आपण घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे कुटुंबाचे नुकसान होते. त्यामुळे असा टोकाचा निर्णय घेताना थोडे थांबा, थोडा विचार करा, प्रत्येक गोष्टीतून मार्ग निघू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. मात्र, सध्या वेगवेगळ्या कारणांवरून मृत्यूला कवटाळणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत आत्महत्येच्या एकूण २२४ घटना घडल्या. यामध्ये १७७ पुरुषांचा समावेश आहे तर ४७ महिला आहेत.
उपाय
- आपल्या मनाची अस्वस्थता जवळच्या व्यक्तीला बोलून दाखवा.
- मनातले विचार बोलून दाखवता येत नसेल तर कागदावर लिहून काढा
- मेडिटेशन, योगा
- कृतज्ञता व्यक्त करणे, संगीत ऐकणे
- मानसिक आरोग्य उपचार घेण्यास प्रोत्साहित करावे.
- मित्र आणि कुटुंबियांनी आधार देणे, ऐकणे, समजून घेणे
- मानसोपचारतज्ज्ञांचा / डॉक्टरांचा सल्ला घेणे.
- योग्य ठिकाण, व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी मदत करावी.
- पाळीव प्राण्यांसोबत मैत्री करावी, त्यांच्यासोबत खेळावे.
कारणे
- कौटुंबिक भांडणे, आपापसातील गैरसमज
- नातेवाईक, मित्र, शेजारी यांच्यातील मतभेद
- अपमानजनक वागणूक, शारीरिक, भावनिक छळ
- नैराश्य
- सातत्याने नकारात्मक विचार करणे
- स्वतःला दोषी वाटत राहणे
- आर्थिक अस्थिरता, नात्यातील गुंतागुंत, चुकलेले निर्णय
- नकार, प्रेमभंग, अपयश पचवण्याची अक्षमता
- व्यसन, शारीरिक दुखणे यामुळे कर्जबाजारी होणे
लक्षणे
- नेहमी हसतमुख किंवा लोकांमध्ये मिसळणारा व्यक्ती अचानक एकटा राहू लागतो
- अबोल होणे
- व्यसनाकडे वळला किंवा त्याचे प्रमाण, व्यसन करण्याची कारणे वाढणे.
- व्यक्तीत अचानक होणारे बदल, त्यामुळे व्यक्तीला अस्वस्थता जाणवणे
- सतत निराशावादी सूर असणे.
- स्वतःला जगण्याची इच्छा नाही, असे बऱ्याचदा बोलून दाखवणे
- सतत मनात विचारांचे वादळ असणे
काही घटना
- चिंचवड येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाने गळफास घेतला
- देहूगाव येथे आर्थिक चणचणीतून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
- कुटुंबियांनी पगाराचे पैशांचे काय करतो, असे विचारल्याने तरुणाने हिंजवडी येथे इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले
- अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केल्याने पिंपरीतील मेट्रो स्थानकावरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली
- चार दिवसांपूर्वी मोशी येथे एकाच झाडाला दोघा मित्रांनी गळफास घेतला
जानेवारी-मार्चमधील आत्महत्येच्या घटना
पोलिस ठाणे पुरुष स्त्री
पिंपरी ४ ०
संत तुकाराम नगर २ ४
चिंचवड ११ १
निगडी ७ ०
भोसरी १० ४
दापोडी ३ १
सांगवी ९ ३
रावेत ३ ०
देहूरोड ३ ३
तळेगाव दाभाडे ७ १
तळेगाव एमआयडीसी ६ १
शिरगाव २ ०
हिंजवडी १२ ४
बावधन ५ १
वाकड १३ ५
काळेवाडी ५ ४
चाकण १२ १
दिघी १४ १
आळंदी ७ ३
म्हाळुंगे १८ ३
चिखली १६ ४
एमआयडीसी भोसरी ८ ३
एकूण १७७ ४७
‘‘मानसिक आरोग्य आणि आजार याविषयी अजूनही आपल्या समाजात असलेले प्रचंड अज्ञान आणि गैरसमज यामुळे कित्येक व्यक्ती यामध्ये स्वतःला कधी नैराश्याच्या दरीत झोकून देतात. त्यांचे त्यांना व कुटुंबालाही कळत नाही. आत्महत्या रोखण्याचे प्रयत्न वैयक्तिक, नातेसंबंध आणि समाज पातळीवर होऊ शकतात. टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी थोडे थांबा, थोडा विचार करा, प्रत्येक गोष्टीतून मार्ग निघू शकतो, आपली समस्या व्यक्त करा.
- वंदना मांढरे, समुपदेशिका
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

