

चापेकर स्मारक एक मेपासून खुले
पिंपरी, ता. १८ ः पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या सहकार्याने चिंचवडगावात उभारलेल्या क्रांतिवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण व राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चिंचवड गावातील चापेकर वाडा येथे झाला. यावेळी त्यांनी स्मारकाची पाहणी केली. एक मेपासून सर्व नागरिकांसाठी स्मारक खुले केले जाणार आहे.
स्मारक पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे उपस्थित होते. चापेकर स्मारकामध्ये कोनशिला अनावरण, समिधा अर्पण, विविध संस्थांचा सन्मान कार्यक्रम झाला. स्मारकाच्या पाहणीनंतर समरसता गुरुकुलममध्ये भेट दिली. त्या ठिकाणी विद्यार्थिंनी औक्षण केले. संगणक कक्ष, वराहमिहिर कालीन प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, हस्तकला प्रदर्शन व रंगमंचचे उद्घाटन झाले.
ही ऐतिहासिक घटना : मुख्यमंत्री
भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये चापेकर बंधूंचा अतुलनीय शौर्य राहिलेले आहे. रँडचा वध करून चापेकर बंधू निर्धाराने फासावर गेले. पण मातृभूमीची सेवा करणे सोडली नाही. अशा चापेकर बंधूंचे स्मारक होणे ही आपल्या देशाच्या इतिहासात अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. चापेकर बंधू यांच्या जीवनातील प्रसंग जिवंत करणारे स्मारक तयार झाले आहे. प्रत्येक शालेय विद्यार्थ्याने हे स्मारक बघितलेच पाहिजे. येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल. चापेकर बंधूंच्या स्मारकात कुटुंबामध्ये जे प्रगतिशील विचार होते ते पाहायला मिळणार आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा क्रांतिवीर चापेकर स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.