

पिंपरी, ता. १८ : राज्य शासकीय संघटना (मध्यवर्ती) पिंपरी- चिंचवड सेवानिवृत्तांची वार्षिक सर्वसधारण सभा व आनंद मेळावा पार पडला. संत तुकारामनगर, पिंपरी येथील मंगलसेन बहल सभागृहात हा मेळावा पार पडला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. या वेळी शाखा प्रमुखांचे पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी महापौर योगेश बहल यांनी मनोगत व्यक्त केले. कोशागार अधिकारी पुणेचे देवराम शेळके यांनी कोषागाराची माहिती दिली. पिंपरी-चिंचवड निवृत्त संघटनेचे (मध्यवर्ती) अध्यक्ष श्रीकांत मोने यांनी महापालिकेच्या क्षेत्रातील सात शाखांचा उल्लेख करून त्यांच्यामार्फत महापालिका क्षेत्रातील पेन्शनराचे काम चालते. संस्थेच्या कामाचा लेखाजोखा मांडला. शाखा प्रमुख शांताराम वाळुंज, रमेश इनामदार, वसंतराव कदम, राजाराम भोरे, उपाध्यक्ष आरजी घारेपाटील, विभागीय चौकशी अधिकारी विष्णुकांत बोरसे यांनी आपापल्या शाखांची माहिती दिली.
गोविंद खावासखान, अल्लमगीर नायकवडी आदींसह दोघांचा सत्कार करण्यात आला. नामदेव तारू यांनी सूत्रसंचालन केले. कुमुदिनी घोडके, गणेश विपट यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.