

पिंपरी, ता. ४ ः राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत शहरातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. गुणवत्ता यादीत शहरातील नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ‘सारथी’च्या शिष्यवृत्तीसाठी तीन विद्यार्थी प्राथमिकचे तर एक विद्यार्थी माध्यमिक विभागाचा पात्र ठरला आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ही आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील, पण हुशार विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी दिली जाते. आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षेमार्फत २२ डिसेंबर २०२४ रोजी शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १ एप्रिल रोजी घोषित झाला. नऊ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले. या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष १२ हजार पुढील चार वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
‘सारथी’ची शिष्यवृत्ती
‘सारथी’ संस्थेमार्फत मराठा, कुणबी, मराठा - कुणबी, कुणबी- मराठा या लक्षीत गटातील विद्यार्थ्यांना एनएमएमएस परीक्षेत पात्र झाल्यास प्रती वर्ष ९ हजार ६०० रुपये बारावीपर्यंत शिष्यवृत्ती मिळते.
अशी आहे परीक्षा
यात मानसिक क्षमता चाचणी आणि शैक्षणिक क्षमता चाचणी या दोन परीक्षा असतात. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मागील वर्षीच्या परीक्षेत किमान ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक असते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी अनेक शिष्यवृत्ती योजना आणि सुविधा उपलब्ध आहेत. या योजनांद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यास मदत होते. निवडलेल्या विद्यार्थ्यांना १२,००० रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते, जी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते. आठवीमध्ये शिकणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत.
‘एनएमएमएस’ गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
शाळा - विद्यार्थ्याचे नाव
मोशी कन्या शाळा- निशा गायकवाड
मोशी कन्या शाळा - सानिका साबळे
दिघी कन्या शाळा - नम्रता कळसे
जाधववाडी कन्या शाळा - शशिकला थोरात
------------------------------------फरहीन शेख
................................................आदित्य पवळे
................................................राम संजीवन
चिखली शाळा - स्वामी महादेव
सोहम जाधव
सारथी गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
शाळा - विद्यार्थ्याचे नाव -
-जाधववाडी कन्या शाळा - शरयू राऊत
-------------------------------------निमिता माहोरे
म्हेत्रेवाडी कन्या शाळा - शुभवी नेमाणे
‘‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत स्वतःची गुणवत्ता सिद्घ करून पुढील शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसाह्य होत असल्याने हुशार विद्यार्थ्यांना अपेक्षित उच्च शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळते.’’
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.