

मंगेश पांडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ : राज्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखू विक्रीला मनाई आहे. तरीही, शहर-उपनगरांत या पदार्थांची तस्करी आणि विक्री जोरात सुरू आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रांत गुटखा विक्री करणाऱ्यांवर मागील वर्षभरात १२७ गुन्ह्यांमध्ये १३७ जणांना अटकही केली. यामध्ये एक कोटी ४६ लाख ५६ हजार ३९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सुरू असताना दुसरीकडे गुटखा, सुगंधित तंबाखूची तस्करी आणि विक्री जोरात सुरू आहे.
- पोलिसांकडून व्यसनमुक्तीबाबत समुपदेशन
शहरातील सर्व पोलिस ठाणे स्तरावर दाखल गुन्ह्यांतील अल्पवयीन मुलांचे मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर यांच्यामार्फत समुपदेशन व मार्गदर्शन केले जात आहे. या मुलांना शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून दिले जात आहे. या बालकांचे पुनर्वसन करून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पोलिस करत आहेत.
- औषधोपचार, खेळांचे प्रशिक्षण
गुन्हेगारी मार्गावरील बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाल विशेष पोलिस पथकाच्या उपक्रमांतर्गत प्रशिक्षकाद्वारे विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या बालकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फतीने व्यसनमुक्तीबाबत समुपदेशन करून औषधोपचार केले जातात.
तंबाखूजन्य पदार्थ बेकायदा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. तसेच महापालिकेशी समन्वय साधून संबंधित अनधिकृत टपऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. शाळा परिसरातील कारवाईवर अधिक लक्ष दिले जात आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.
- संतोष पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक.
वर्षभरातील गुटखाविरोधी कारवाई
पोलिस ठाणे दाखल गुन्हे अटक आरोपी
पिंपरी १० १०
संत तुकारामनगर २ २
भोसरी ३ ३
दापोडी २ २
सांगवी २ २
चिंचवड ५ ४
निगडी ८ ८
रावेत ६ ७
देहूरोड ७ ८
तळेगाव ३ ३
शिरगाव २ २
तळेगाव एमआयडीसी १ १
वाकड १४ १८
काळेवाडी १ १
हिंजवडी १६ २१
बावधन ० ०
चाकण ९ १०
म्हाळुंगे १० १०
आळंदी ५ ५
दिघी ४ ५
चिखली १३ १३
भोसरी एमआयडीसी ४ २
--------------------------------------------------
एकूण १२७ १३७
(जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.