पिंपरी जागा फेरबदल प्रस्ताव

पिंपरी जागा फेरबदल प्रस्ताव
Published on

भिमसृष्टी जागेबाबत
हरकती, सूचना पाठवा

पिंपरी, ता. ४ ः महापालिकेच्या मंजूर विकास योजनेनुसार पिंपरीतील सर्वे क्रमांक १५५ अ मधील पीसीएमटी (पिंपरी-चिंचवड महानगर परिवहन मंडळ आता पीएमपी) बस टर्मिनससाठी एक हेक्टर क्षेत्र आरक्षित होते. प्रशासकांकडील २१ फेब्रुवारी २०२५ रोजीचा महापालिका ठराव क्रमांक ८५३ नुसार बस टर्मिनस आरक्षणातील नकाशात दर्शविलेले अंदाजे चार ७५० चौरस मीटर क्षेत्र भिमसृष्टी करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमानुसार फेरबदलचा कार्यवाही केली आहे. हा फेरबदल प्रस्ताव महापालिका नगररचना उपसंचालक कार्यालयात नागरिकांसाठी उपलब्ध आहे. त्याबाबत हरकती व सूचना एक महिन्याच्या आत मागितल्या आहेत. या हरकती व सूचनांचा विचार करून फेरबदल प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची सूचना प्रशासक शेखर सिंह यांनी गुरुवारी (ता. ३) जाहीर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com