‘महिलांचे बदलते भावविश्व’ यावर चर्चासत्र उत्साहात

‘महिलांचे बदलते भावविश्व’ 
यावर चर्चासत्र उत्साहात
Published on

पिंपरी, ता. ४ ः प्रभू श्रीराम जन्म महोत्सवानिमित्त स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स यांच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘महिलांचे बदलते भावविश्व’ या विषयावर पार पडलेल्या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया होते. याप्रसंगी प्रा. सुरेखा कटारिया, सुशीला मुथा, खिवराज मुथा, भवरीलाल कांकरिया, प्रा. प्रकाश कटारिया, अंजली शहा, नितीन बेदमुथा, संदेश गदिया, सुभाष सुराणा, सीमा गांधी आदी उपस्थित होते.
चर्चासत्रात कालची, आजची आणि उद्याची स्त्री या अनुषंगाने महिलांच्या विचारसरणी यावर ऊहापोह झाला. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय दृष्टिकोनातून सुदृढ होणाऱ्या महिलांच्या आयुष्याचा आढावा घेण्यात आला. स्त्रियांची वेशभूषा, केशभूषा यातून बदलत जाणारे भावविश्व त्यातील स्थित्यंतरे यावरही उपस्थितांनी विचार व्यक्त केले. मीना पोखरणा, बाला बाफना, अनिता नहार, नितल फुलपगार यांनी नियोजन केले. यावेळी जयेश शेठ यांनी लिहिलेल्या ‘सुख की गुरुकिल्ली’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. चर्चासत्राची सुरुवात जस्मिन पोखरणा यांनी सुंदर भजनाने केली. प्रास्ताविक स्वानंदच्या अध्यक्षा शोभा बंब यांनी केले; तर आभार सपना जैन यांनी मानले. कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड यांनी सूत्रसंचालन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com