

पिंपरी, ता. ४ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) शिल्लक गाळे आणि रो हाउसच्या ई-लिलावासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण २२ गाळे आणि चार रो हाउससाठी २७२ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. आठ तारखेला ई-लिलाव केला जाणार आहे.
प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक ३०, कन्व्हींसिंग शॉपिंग सेंटरमध्ये पाच व्यापारी दुकानांचा समावेश आहे. पेठ क्रमांक १२ मधील गृहयोजना क्रमांक एक आणि दोनमधील उर्वरित १६ व्यापारी दुकाने आहेत. पेठ क्रमांक चारमधील दुकान क्रमांक सहामधील एका दुकानांचा समावेश आहे. सदर दुकान अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी आरक्षित आहे. पेठ क्रमांक सहामधील चार रो हाऊस आहेत. यामध्ये रो हाऊस क्रमांक ए-५, रो हाऊस क्रमांक बी-६, रो हाऊस क्रमांक ए-८ आणि रो हाऊस क्रमांक बी -८ असे एकूण २२ गाळे, चार रो हाऊस यांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. २४ मार्चपर्यंत अंतिम मुदत होती. यामध्ये एकूण २७२ नागरिकांनी अर्ज केला आहे. ८ एप्रिल रोजी ऑनलाइन पद्धतीने ई-लिलाव होणार आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय ही प्रक्रिया होणार असल्याची माहिती जमीन व मालमत्ता विभागाचे उपायुक्त हिम्मत खराडे यांनी दिली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.