

पिंपरी : भरधाव मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. ही घटना पुनावळेतील कोयते वस्ती येथील अंडरपास येथे घडली. याप्रकरणी जखमी महिलेचा मुलगा प्रतीक रवींद्र सातपुते (वय ३०, रा. पांढरे वस्ती, पुनावळे) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटारचालक किरण ओमप्रकाश पाटील (रा. बिजलीनगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या आई दुचाकीवरून कोयते वस्ती येथे जात होत्या. दरम्यान, पुनावळे अंडरपास येथे त्यांच्या दुचाकीला आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटारीने जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांची आई गंभीर जखमी झाल्या.
बनावट चप्पल विक्रीप्रकरणी व्यावसायिकावर गुन्हा
पिंपरी : बनावट चप्पल आणि बूट विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पिंपरीतील मोरवाडी येथील सेवन स्टार शूज फुटवेअर येथे करण्यात आली. शमशाद ईसरार खान (वय ३७, रा. म्हाडा बिल्डिंग, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी सरफराज अब्दुल रौफ तांबोळी (वय ४२, रा. पवळे चौक, कसबा पंडित, पुणे) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादीच्या रिलॅक्सो फूटवेअर लिमिटेड या कंपनीचे स्वामित्व असलेल्या त्याच नावाचे व चिन्हाचे बनावट चप्पल व बूट असा एकूण एक लाख ३२ हजार ८९३ रुपये किमतीचा माल विक्रीसाठी ठेवला. पोलिसांनी या दुकानावर कारवाई केली.
मोटारीच्या धडकेत दाम्पत्य जखमी
पिंपरी : भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले. हा अपघात निगडीतील त्रिवेणीनगर चौक येथे घडला. याप्रकरणी निगडी येथे राहणाऱ्या ४६ वर्षीय जखमी महिलेने निगडी पोलिस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला आणि त्यांचे पती दुचाकीवरून कृष्णानगर येथून निगडीच्या दिशेने जात होते. त्रिवेणीनगर चौकात भरधाव मोटारीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये फिर्यादी आणि त्यांचे पती रस्त्यावर पडल्याने दोघेही जखमी झाले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.