हवेतील गारव्यामुळे सुखावले नागरिक

हवेतील गारव्यामुळे 
सुखावले नागरिक
Published on

पिंपरी, ता. ४ ः उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. उन्हाळ्यामुळे मार्चपासूनच कमाल तापमानासोबत किमान तापमानातही वाढ झाली होती. किमान तापमान २५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. तर कमाल तापमानही ३९ अंश सेल्सिअसवर पोचले होते. त्यामुळे सकाळी व सायंकाळीही हवेत उकाडा जाणवत होता तर दुपारी उन्हाचा चटका वाढला होता. मात्र, मंगळवारपासून शहरात ढगाळ वातावरण होते. गुरुवारी सायंकाळी शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर हवेत गारवा जाणवत होता. शहराचे किमान तापमान २२ अंश सेल्सिअसवर घसरल्याने शुक्रवारी (ता. ४) सकाळीही वातावरण आल्हाददायक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com