

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ : शहरातील खासगी (ट्रॅव्हल्स) बसचे मार्ग, तसेच त्यांच्या पिकअप-ड्रॉपचे स्थळ स्थानिक पोलिस प्रशासन बदलत आहेत. यामुळे खासगी बसमालक, चालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप पिंपरी-चिंचवड ट्रॅव्हल्स असोसिएशनने केला आहे.
वाहतूक पोलिसांकडून केले जात असलेल्या बदलांना विरोध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड ट्रॅव्हल्स असोसिएशनतर्फे सोमवारपासून (ता.७) चिंचवड येथील वाहतूक पोलीस आयुक्त कार्यालयाशेजारी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे संघटनेची सचिव बाळा दानवले यांनी दिली. वाहतूक पोलिसांकडून वारंवार पिकअप पॉइंट बदलले जात आहेत. त्याचा ग्राहकांनाही त्रास भोगावा लागत आहे. देण्यात आलेले पिकअप पॉइंट हे बाह्य भागांत आहेत. त्या भागात बस आणि रिक्षा जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते असे दानवले म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.