

भोसरी, ता. ९ ः भोसरी, दिघी आणि इंद्रायणीनगरामधील गतिरोधकांबरोबरच रस्त्यांवरही पांढरे पट्टे मारण्यास महापालिकेच्या ई आणि क क्षेत्रीय कार्यालयांनी सोमवारी (ता.७) मध्यरात्रीपासून सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
भोसरी, दिघी, इंद्रायणीगरातील काही रस्त्यांवरील गतिरोधकांवरचे पांढरे पट्टे नाहीसे झाल्याने वाहन चालकांना अपघात होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्याची दखल घेत रस्त्यावरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यास सुरूवात केली आहे. पांढरे पट्टे नाहीसे झाल्याने गतिरोधकांचा अंदाज न येता वाहने त्यावर आदळत होती. त्याचप्रमाणे दुचाक्या घसरून चालकांना अपघातही होत होते. रात्रीच्यावेळेस हे गतिरोधक दिसत नसल्याने ते अतिधोकादायक झाले होते. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेने परिसरातील शाळेसमोरील रस्त्यावरही गतिरोधक उभारले होते. मात्र त्यालाही पांढरे पट्टे मारले नसल्याने ते धोकादायक झाले होते.
PNE25V04978
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.