भर उन्हाळ्यात झाडे जगवण्यासाठी धडपड

भर उन्हाळ्यात झाडे जगवण्यासाठी धडपड
Published on

सोमाटणे, ता. ९ : घोरावडेश्वर डोंगरावर लावलेल्या झाडांच्या संगोपनासाठी केलेल्या उपायांमुळे प्रतिकूल परिस्थितीतही सुमारे दोनशे झाडे वाढवण्यात घोरावडेश्वर प्रतिष्ठानला यश आले.
हरित घोरावडेश्वर करण्याचा उपक्रम घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठानने हाती घेतला असून या उपक्रमाला पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थी मदत करत आहेत. या उपक्रमाअंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून डोंगरावरील धर्मशाळेलगतच्या ओसाड टेकडीवर वृक्षारोपन करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांत प्रतिष्ठान आणि विद्यार्थ्यांनी दोनशे झाडे लावून ती यशस्वीपणे जगवली आहेत. झाडांच्या पाण्यासाठी स्वतंत्र टाकी आणि ठिबक सिंचनाव्दारे पाण्याची सोय करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून तापमानाचा पारा चाळीस अंशांजवळ गेल्याने उष्णतेपासून संरक्षणासाठी सर्व झाडांना प्लॉस्टिक जाळीचे बसवण्यात आली आहे. तसेच वनव्यापासून संरक्षणासाठी झाडांजवळचे गवत काढण्यात आले.

PNE25V04979

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com