

पिंपरी, ता. ९ : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारील (भीमसृष्टी) मैदानात महापालिकेने शुक्रवारपासून (ता. ११) मंगळवारपर्यंत (ता. १५) विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन केले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
प्रबोधन पर्वात महानाट्य, लाइव्ह कॉन्सर्ट, गीतगायन, पोवाडे, कव्वाली, एकपात्री नाट्यप्रयोग, चर्चासत्रे, परिसंवाद, शाहिरी जलसा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रबोधन पर्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे असतील. शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होईल. तत्पूर्वी सकाळी १० वाजता ‘मी जोतिबाची सावित्री’ हा प्रज्ञा गवळी यांचा एकपात्री प्रयोग होईल. ११ वाजता समता कला मंच प्रस्तूत विद्रोही शाहिरी जलसा होईल. त्यानंतर गीतगायन आणि प्रबोधनात्मक गीतांचे कार्यक्रम होतील. ‘गुलामांच्या उतरंडी’ नाटक, ‘क्रांतिसूर्य ते महासूर्य - समतेच्या क्रांतिलढ्याचा प्रवास’ हा परिसंवाद, ‘भारतीय संविधानाची गौरवगाथा : ‘वुई द पिपल’ कार्यक्रम आणि रात्री ८.३० वाजता ‘क्रांतिसूर्य’ नाटक होईल.
शनिवार, ता. १२ एप्रिल
सकाळी १० : परिवर्तन कला महासंघाचे गीतगायन. दुपारी १ : गझल गायक अशोक गायकवाड, संगीत विशारद निलेश कसबे आणि प्रशांत पवार यांचा कार्यक्रम. दुपारी २.३० : भारत का संविधान गीतगायन. सायंकाळी ४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयावर चर्चासत्र. सायंकाळी ६ : आनंद शिंदे यांचा महामानवांच्या गीतांचा कार्यक्रम.
रविवार, ता. १३ एप्रिल
सकाळी १० : सपना खरात आणि भगवान शिरसाठ यांचे गीतगायन. सकाळी ११.३० : बुद्ध भीमगीतांची परिवर्तनवादी मैफिल. दुपारी १ : शाहिरी जलसा. दुपारी २.३० वाजता : धीरज वानखेडे, स्वप्नील पवार यांचे गीतगायन. सायंकाळी ४ : आनंद कीर्तने गीतगायन. सायंकाळी ७ : मेरा भीम जबरदस्त है. रात्री ८.३० : साधना सरगम यांचे गीतगायन.
सोमवार, ता. १४ एप्रिल
सकाळी ६ : शास्त्रीय गायक डॉ. मधुकर मेश्राम यांचा धम्मपहाट कार्यक्रम. सकाळी ८ : कबीर नाईकनवरे यांचा ‘भारत का संविधान’. सकाळी ९.३० : भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाची मानवंदना. सकाळी १० : एकता कर्मचारी महासंघातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी. दिया बनसोडे यांचा नृत्याविष्कार. सकाळी १०.३० : आदिवासी कलानृत्यातून अभिवादन. सकाळी ११ : भीमस्पंदन. मंजुषा शिंदे व चंद्रभागा गायकवाड गीतगायन. दुपारी २ : तुफानातले दिवे. सायंकाळी ५ : विष्णु शिंदे आणि खंजिरी वादक मिरा उमप यांचे गीतगायन. सायंकाळी ७.३० : राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. पाशा यांच्या दिव्यांग कलाकारांचा सहभाग असलेला नृत्य संगीतमय कलाविष्कार ‘ट्रिब्यूट टू डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स’ नृत्य संगीतमय कार्यक्रम. रात्री ९.३० : तुझ्या पाऊलखुणा भीमराया कार्यक्रम.
मंगळवार, ता. १५ एप्रिल
सकाळी १० : स्थानिक कलावंतांचे गीतगायन. सानिका जाधव यांचे ‘मी रमाई बोलते’ एकपात्री. दुपारी १ : स्थानिक कलावंतांचे गीतगायन. दुपारी ४ : भीमबुद्ध गीतांची गोड वाणी. सायंकाळी ७ : कवितांचे अभिवाचन. रात्री ८ : प्रज्ञा इंगळे यांचे गीतगायन.
बुधवार, ता. १६ एप्रिल
सायंकाळी ५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आणि भारताच्या संविधान निर्मितीवर आधारित ‘संविधान शिल्पकार’ महानाट्य. स्थळ : सांगवी येथील पीडब्लूडी मैदान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.