

पिंपरी, ता. ८ ः पिंपरी चिंचवड शहराचा पारा सलग दुसऱ्या दिवशीही चाळीशीपार जाऊन पोचला. पुणे वेधशाळेने केलेल्या निरीक्षणात बुधवारी (ता. ९) चिंचवड येथील कमाल तापमान ४०.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले तर किमान तापमानातही वाढ झाली असून, किमान तापमान २६ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. दिवसभर जाणवणारा उन्हाचा चटका व सायंकाळी जाणवणारा उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाचा तडाखा हा सकाळी नऊनंतरच वाढत असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. उन्हापासून बचावासाठी दुपारी जलतरण तलावांमध्ये पोहण्यासाठी नागरिक आपल्या मुलांसह गर्दी करत आहेत. तर शाळांना सुट्या लागल्यामुळे सायंकाळी मोकळ्या हवेत फेरफटका मारण्यासाठी नागरिक उद्यानांमध्ये जाणे पसंत करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.