हवामान बदलांच्या लढ्यासाठी आंतरराष्ट्रीय करारात सहभाग आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

हवामान बदलांच्या लढ्यासाठी 
आंतरराष्ट्रीय करारात सहभाग
आयुक्त शेखर सिंह यांची माहिती
Published on

पिंपरी, ता. ९ ः हवामान बदलांशी लढण्यासाठी जगभरातील शहरांनी एकत्र येऊन ग्लोबल कोव्हेनंट ऑफ मेयर्स फॉर क्लायमेट अँड एनर्जी (जीकॉम) हा आंतरराष्ट्रीय करार केला आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही सहभाग घेतला आहे.
‘जीकॉम’मध्ये १४४ देशांतील १३ हजार ७०० हून अधिक शहरे सहभागी झाली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील हरितगृह वायू कमी करणे, स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेचे प्रमाण वाढविणे, हवामान बदलामुळे येणाऱ्या आपत्तींना सामोरे जाण्यासाठी आराखडा तयार करणे आणि पर्यावरण रक्षणासाठी सकारात्मक पावले उचलणे हा कराराचा उद्देश आहे.

कराराचा शहराला फायदा
- देश-विदेशातील इतर शहरांशी अनुभव आणि माहितीची देवाणघेवाण करता येणार
- हवामान बदलासंदर्भात तांत्रिक मदत, प्रशिक्षण, उपयुक्त माहिती मिळणार
- आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी ठरलेले उपाय वापरण्याची संधी मिळणार
- पर्यावरणाचे रक्षण, ऊर्जा वापरात सुधारणा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणार

‘‘पिंपरी-चिंचवडसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरासाठी पर्यावरण रक्षण ही आपली जबाबदारी आहे. ‘जीकॉम’ करारात सहभाग घेतल्यामुळे आपल्याला जागतिक अनुभव, तांत्रिक मदत आणि प्रभावी उपायांचा लाभ होणार आहे, तो शाश्वततेकडे वाटचाल करताना अत्यंत उपयुक्त ठरेल. २०३२ पर्यंत स्वच्छ, हरित शहर बनवण्याच्या ध्येयासाठी हे पाऊल निर्णायक ठरेल.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com