

सोमाटणे, ता. १० : तीन महिन्यांत सहा वेळा कुंपण तोडून अनधिकृत मार्ग तयार करण्याचा उर्से पेट्रोल पंपाजवळील प्रकार सुरूच आहे. यामुळे द्रुतगती मार्गावर अपघात होण्याची भीती आहे. शिवाय, टोल टाळण्याचाही प्रयत्न याद्वारे केला जात आहे.
जुन्या उर्से टोलनाक्याचे स्थलांतर झाल्यानंतर महामार्ग पोलिस, आयआरबी सुरक्षा यंत्रणेसह सर्वच सुरक्षा यंत्रणा नवीन टोलनाक्याजवळ तैनात आहेत. या संधीचा फायदा घेऊन उर्से पेट्रोल पंपाजवळ कुंपण तोडून प्रवेश मार्ग तयार केला जात आहे. यातून टोल चुकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी परिसरातील वाहनचालकांनी संरक्षक कुंपणाला गेट तयार केले. इतकेच नव्हे, तर त्याला कुलूपही लावले. ते गरजेनुसार उघडून अनधिकृत प्रवेश करण्याची सोय केली. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे यांच्या आदेशानुसार ‘आयआरबी’ कंपनीने तातडीने हा अनधिकृत प्रवेश मार्ग बंद करुन तेथे लोखंडी कुंपण तयार केले. परंतु, तेदेखील काहीच दिवस टिकले. चार दिवसांपूर्वी पुन्हा कुंपण तोडण्यात आले असून, यातून अनधिकृत वाहतूक सुरू झाली आहे. यातून मोठा अपघात होण्याचा धोका असल्याने येथील प्रवेश मार्ग तातडीने बंद करण्याची गरज आहे.
महामार्गालगतचे संरक्षक कुंपण तोडण्याचा प्रकार दिसून आला आहे. यापुढे असे आढळल्यास संबंधितावर त्वरित कारवाई केली जाईल.
- डी.ए.के.जोसुआ, कार्यकारी संचालक, सुरक्षा विभाग, आयआरबी
PNE25V05216
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.