व्यावसायिक आघाडीवरच बिघाडी

व्यावसायिक आघाडीवरच बिघाडी

Published on

अविनाश ढगे
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. ५ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) बिगर वाहतूक उत्पन्नाचे स्रोत शोधणे व उत्पन्न मिळावे, यासाठी नेमलेला व्यावसायिक विभाग अजूनही कागदावरच आहे. सुमारे अडीच वर्षांत या विभागाची एकही बैठक होऊ शकलेली नाही.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’ हद्दीत ‘पीएमपीएमएल’ सेवा देते. रोज सुमारे १० ते १२ लाख प्रवासी या सेवेचा वापर करतात. यात प्रामुख्याने विद्यार्थी, नोकरदार, महिलांची संख्या जास्त आहे. तिकीट, पास, बस तसेच थांब्यांवरील जाहिराती, व्यावसायिक संकुलांचे भाडे, प्रवाशांना केलेला दंड असे उत्पन्नाचे स्रोत आहेत.
मुख्य मदार तिकीट, पास विक्रीवरच आहे. २०२४-२५ मध्ये सरासरी ९१ टक्के उत्पन्न तिकीट आणि पास विक्रीतून मिळाले. दुसरीकडे उत्पन्नाच्या तुलनेत खर्च दुप्पट होत आहे. त्यामुळे संचलनातील तूट ७०६ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. ही तूट कमी करणे आणि बिगर वाहतूक उत्पन्नाचे स्रोत शोधण्यासाठी हा विभाग स्थापन करण्यात आला आहे. सहव्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखालील या विभागाला बैठकीसाठी मात्र अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

---
आकडेवारी

२०२३-२४ ः
६६९ कोटी ७४ लाख रुपये ः एकूण उत्पन्न
४३६ कोटी ४ लाख ९१ हजार ८९३ रुपये ः तिकीट विक्री
१७० कोटी ५५ लाख ४२ हजार ९० रुपये ः पास विक्री
७०६ कोटी ः संचलनातील तूट
---
२०२४-२५
५७२ कोटी १७ लाख ९६ हजार ३४३ रुपये ः एकूण उत्पन्न
३९८ कोटी ४३ लाख ५ हजार ७०२ रुपये ः तिकीट विक्री
१६१ कोटी ३० लाख ३९ हजार १०० रुपये ः पास विक्री
६४६.५३ कोटी ः संचलनातील तूट
----------
संचलन तूट (कोटीत)
२०१६-१७ ः २१०.४४
२०१७-१८ ः २०४.६१
२०१८-१९ ः २४७.०४
२०१९-२० ः ३१५.१०
२०२०-२१ ः ४९४.१६
२०२१-२२ ः ७१८.९७
२०२२-२३ ः ६४६.५३
२०२३-२४ ः ७०६.८८

---
विभागाची जबाबदारी

- देशभरातील इतर सार्वजनिक वाहतूक संस्थांप्रमाणे बिगर वाहतूक उत्पन्नाचे स्रोत शोधून उपाययोजना करणे
- इतर सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या संस्थांच्या उत्पन्नाचे स्रोत शोधणे
- उत्पन्न वाढीसाठी काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास करणे
--- -----
अशी आहे रचना

- अध्यक्ष ः सहव्यवस्थापकीय संचालक
- सचीव ः मुख्य वाहतूक व्यवस्थापक (व्यावसायिक)
सदस्य ः ५
१. मुख्य लेख व वित्त अधिकारी
२. मुख्य अभियंता (स्थापत्य)
३. कनिष्ठ अभियंता (विद्यूत)
४. विधी अधिकारी
५. मालमत्ता अधिकारी

---- ---
मी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे आधी मी व्यावसायिक विभागाबाबत माहिती घेतो. उत्पन्न वाढविण्यासाठी या विभागाचा उपयोग होणार असेल तर नक्कीच तो कार्यान्वित करण्यात येईल.
- पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
--- ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com