धर्मादाय रूग्णालयातील डॉक्टरवर गुन्हा दाखल

धर्मादाय रूग्णालयातील
डॉक्टरवर गुन्हा दाखल
Published on

पिंपरी, ता. १० : बावधन परिसरातील एका रूग्णालयात महिलेच्या उपचारासाठी वीस हजार रुपये घेतल्याप्रकरणी एका डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे.
प्रवीण वामनराव लोहोटे (वय ५५, रा. जुना मुंढवा रोड, चंदननगर) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप लकाप्पा शिवशरण (रा. एनडीए रोड, उत्तमनगर, पुणे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या चुलतीला पित्ताशयाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. हे रूग्णालय धर्मादाय असल्याने रुग्णाच्या उपचारासाठी एक रुपयाही खर्च येत नसताना डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाइकांना तुमच्या रुग्णाची परिस्थिती खूप नाजूक असून, त्यांच्यावर तत्काळ उपचार करावे लागतील. नाहीतर रुग्णाचे काही खरे नाही. तसेच, यात रूग्ण दगावू शकतो. रुग्णाला वाचवायचे असेल तर मला शस्त्रक्रियेसाठी पैसे द्यावे लागतील. तरच रुग्णावर उपचार करेन. नाहीतर उपचार करणार नाही, अशी भीती दाखवून डॉक्टरने वीस हजार रुपये घेतले.
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com