पवनेतील पाण्याचे नमुने तपासण्याची मागणी
सोमाटणे, ता. १३ ः नदीलगतच्या गावातील सांडपाण्यामुळे पवनेची वाटचाल प्रदूषणाकडे सुरु झाली असून यावर उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पाण्याचे नमुने तपासावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राकेश घारे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.
पवना नदी काठावर गहुंजे, शिरगाव, सोमाटणे, धामणे, बेबडओहोळ, परंदवडी, उर्से, शिवणे आदी गावांत गेल्या एक दशकात सिमेंटच्या जंगलात मोठी वाढ झाली आहे. लोकसंख्येतही दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याच प्रमाणात पवनेत सोडल्या जाणाऱ्या गटाराच्या पाण्यातही वाढ झाली आहे.
या सर्व गावांतील सांडपाण्यासह उर्से, बेबडओहोळ येथील कंपन्यांतील रसायनयुक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पवनेत मिसळले जाते. यामुळे बेबडहोळपासून पुढे पवनेचे पाणी प्रदूषित झाले आहे. त्यातच भर म्हणून अनेक गावांनी बंद गटार योजना राबवल्या आहे. या बंद गटार योजनेचे सांडपाणी प्रत्यक्ष नदीत सोडले जात आहे. याच दूषित पाण्याचा वापर पवनमावळातीस सर्व गावांसह मामुर्डी, रावेत, किवळे, तळेगाव, पिंपरी चिंचवड येथील पाणी योजनांद्वारे केला जातो. सर्वच गावांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते गटाराचे पाणी पवनेत सोडणे गरजेचे असतानाही सर्वच गावांनी कोणतीही दखल न घेता दूषित पाणी पवनेत सोडले आहे. यामुळे बेबडओहोळ ते रावेतपर्यंत नदीचे प्रचंड प्रदूषण झाले आहे. या दूषित पाण्याचा परिणाम आरोग्यावर होत असल्याने तातडीने पाण्याचे नमुने तपासून आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी घारे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.
---
फोटो
03286
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

