पाणीपुरवठा यंत्रणेसह विविध खर्चास मंजुरी

पाणीपुरवठा यंत्रणेसह विविध खर्चास मंजुरी
Published on

पिंपरी, ता. १३ ः शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक विविध विषयांसह अन्य पायाभूत सुविधा व विकास कामांना महापालिका स्थायी समिती सभेने बुधवारी मान्यता दिली. पाणीपुरवठा संदर्भातील विषयांमध्ये निगडी सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्रात नवीन ऑटो-क्लोरीनेशन सिस्टीम बसविणे, देखभाल-दुरुस्ती करणे आणि सेक्टर २३ व चिखली जलशुद्धीकरण केंद्रांसाठी निर्जंतुकीकरण प्रक्रियेस आवश्यक क्लोरीन गॅस खरेदीस मान्यता आदींचा समावेश आहे.
महापालिका स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप आदी उपस्थित होते. बिजलीनगर, वाकड, पुनावळे, ताथवडे, दापोडी, नवी व जुनी सांगवी परिसरातील जुन्या पाइपलाइन बदलून नवीन पाइपलाइन टाकणे; थेरगाव, रहाटणी, पिंपरी, कासारवाडी, दापोडी, सांगवी, चिखली, मिलिंदनगर, कैलासनगर, वैभवनगर परिसरातील जलनिस्सारण सुधारणा, जलनिस्सारण नलिका टाकणे, सध्याच्या नलिकांची देखभाल-दुरुस्ती करणे; भोसरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाकड, पुनावळे, ताथवडे, पिंपरी, थेरगाव, रहाटणी परिसरातील नवीन रस्ते विकसित करणे; देखभाल-दुरुस्ती करणे, आदी विषयांना मान्यता दिल्याचे सभापती बारणे यांनी सांगितले.

लष्करी हद्दीत सदनिका उभारणी
विकास आराखड्यातील पिंपळे सौदागर येथील १८ मीटर रुंद रस्ता विकसित केला जाणार आहे. त्यासाठी संरक्षण विभागाची जागा आवश्यक आहे. त्या बदल्यात संरक्षण विभागाच्या मागणीनुसार लष्करी हद्दीत सोयीसुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार घोरपडी, खडकी आणि औंध येथे सदनिका उभारणीच्या कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीस मान्यता देण्यात आली.

महत्त्वाचे निर्णय
- काळेवाडी ज्योतिबा उद्यानात कुस्तीचा आखाडा उभारणे
- पिंपळे निलखमध्ये महिला बाजार हट केंद्र उभारणे
- चिंचवड मरळ उद्यान ११ महिन्यांसाठी चालविण्यास देणे
- जिजामाता रुग्णालयात स्थापत्य विषयक कामे करणे
- जुनी सांगवी शाळा इमारतींची स्थापत्य व रंगरंगोटी कामे करणे
- ई-लर्निंगअंतर्गत शाळा व कार्यालयांत इंटरनेट बँडविड्थ सेवा देणे
- विविध भागात नगररचना योजना राबविण्यासाठी नियुक्त सल्लागार संस्थेस मुदतवाढ देणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com