

पिंपरी, ता. १४ ः भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी आणि शहरातील कारभारी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देतील का? असा प्रश्न उपस्थित करत ‘पंतप्रधानांच्या आवाहनाला पदाधिकाऱ्यांची साथ मिळेल का?’ असे वृत्त ‘सकाळ’ने गुरुवारी प्रसिद्ध केले. त्यानंतर महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन रविवारपासून (ता. १७) होणारा परदेश दौरा रद्द करून महापालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांना काटकसरीचे आवाहन केले.
देशाच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केले आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवडमधील भाजपचे कारभारी काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले होते. कारण, सहा फेब्रुवारी २०२६ रोजी सत्ता स्थापन केली तेव्हापासून आजपर्यंतच्या तीन महिन्यांत घेतलेले निर्णय आणि होऊ घातलेले निर्णय काटकसरीला तिलांजली देणारे आणि अधिक खर्चिक ठरणारे आहेत. त्यामध्ये १७ मेपासून सुरू होणारा महापौरांचा अझरबैजान देशाचा दौरा; उपमहापौर, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, स्थायी समिती अध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांसाठी सुरक्षा रक्षक नियुक्तीचा प्रस्तावाचा समावेश होता.
‘सकाळ’च्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद
पदाधिकारी, सदस्य वाहन ‘शेअरिंग’ करतील का?, घरापासून महापालिकेत येण्यासाठी पदाधिकारी स्वतःचे वाहन वापरतील का?, विविध कार्यक्रमांवेळी सजावट खर्च कमी करतील का?, सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर होईल का? विविध प्रकल्पांची भूमिपूजने, उद्घाटने साध्या पद्धतीने होतील का ? अशा स्वरुपाचे प्रश्न ‘सकाळ’ने गुरुवारच्या वृत्तात उपस्थित केले होते. त्याला महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
काटकसरीबाबत महापौर रवी लांडगे म्हणाले...
- १७ ते २२ मे दरम्यानचा अझरबैजान देशातील दौरा मी रद्द केला आहे
- आठवड्यातून एक दिवस महापालिकेत येण्या-जाण्यासाठी सायकल वापरणार
- इंधन भत्ता ३८ हजारांवरून ५० हजार रुपये देण्याचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करणार
- शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेसाठी मी सायकलने महापालिकेत येणार
- नगरसदस्य, अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस सायकल, वाहन शेअरिंग, मेट्रो, पीएमपीने यावे
- नागरिकांनीही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन काटकसर करावी
- एकाच भागात राहणारे अधिकारी एकाच ईव्ही वाहनातून येतील, असा कार्यक्रम राबवणार
- परदेशात जाण्यासह होणारा अनावश्यक खर्च वाचणार
काटकसरीतून महापौरांचा काढता पायही
- महापालिकेत सायकलने येणार, त्यादिवशी पाहणी दौरे नाही
- फक्त घरून महापालिकेत येणार आणि महापालिकेतून घरी जाणार
- परदेश दौरा रद्द केला असला तरी इंदूर, सूरत अशा देशांतर्गत शहरांचा दौरा करणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.