जलतरण तलावात बुडून चिंचवडमध्ये मुलाचा मृत्यू

जलतरण तलावात बुडून चिंचवडमध्ये मुलाचा मृत्यू
Published on

पिंपरी, ता. १७ : जलतरण तलावात १७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना चिंचवडच्या केशवनगरमध्ये शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
श्रवण समीर गायकवाड (रा. द्वारकासाई सोसायटी, रहाटणी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो
कै. वस्ताद बाळासाहेब गावडे जलतरण तलावात गेला होता. बराच वेळ तो पाण्याबाहेर न आल्याने मित्रांनी ही बाब जीवरक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्याला बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच श्रवणचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com