पवनेवरील मामुर्डी - सांगवडे पुलाचे निम्मे काम पूर्ण

पवनेवरील मामुर्डी - सांगवडे पुलाचे निम्मे काम पूर्ण
Published on

किवळे, ता. १८ : पवना नदीवर मामुर्डी ते सांगवडे दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या कामाला वेग आला असून सध्या सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जानेवारी २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याचे नियोजन आहे.

एक दृष्टिक्षेप

- प्रभाग क्रमांक १६ मधील मामुर्डी स्मशानभूमीजवळ पुलाचे बांधकाम सुरू
- पुलासाठी अंदाजे ३७ कोटी २५ लाख ९१ हजार ३६६ रुपये खर्च
- मे. ए.आर. कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत पुलाची बांधणी सुरू
- प्रकल्प सल्लागार म्हणून एम/एस एन्व्हायरोसेफ कन्सल्टंट कार्यरत
- पुलाच्या कामाचा आदेश ४ फेब्रुवारी २०२५ रोजी, जून २०२५ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात
- ३० महिन्यांची मुदत

जोड रस्त्यांचा विकास
- या पुलाची एकूण लांबी १४०.४६ मीटर, १५ मीटर रुंदीचा पूल, १.५ मीटरचा पदपथ प्रस्तावित
- राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूस ८४ मीटर, सिंबायोसिस बाजूस ७४ मीटर आणि सांगवडे बाजूस ६० मीटर लांबीचे रस्ते विकसित केले जाणार

‘कनेक्टिव्हिटी’ वाढणार
- या पुलाने बाह्यवळण मार्गावरील देहूरोड सेंट्रल ते हिंजवडी दरम्यानची ‘कनेक्टिव्हिटी’ मोठ्या प्रमाणात वाढणार
- मामुर्डी, गहुंजे, साळुंब्रे, किवळे, सांगवडे, नेरे आणि जांबे ही गावे दळणवळणाच्या दृष्टीने जोडली जाणार
- स्थानिक नागरिक, व्यावसायिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार
- हा पूल द्रुतगती मार्गापासून जवळ असल्याने वाहतुकीची विभागणी होणार
- मुकाई चौकातील वाहतूक कोंडीवरील ताण कमी होण्यास मदत
- मामुर्डी, सांगवडे, साळुंब्रे आणि परिसरातील गावांच्या बाजारपेठेला चालना मिळेल

पुलासाठी एकूण १३ खांब प्रस्तावित असून मामुर्डी बाजूचे ८ खांब पूर्ण झाले आहेत. सध्या स्लॅबचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. सांगवडे बाजूला आवश्यक जागेबाबत पीएमआरडीएकडे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून तो या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे.
- नीलेश दाते, उपअभियंता प्रकल्प विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका

हा पूल परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो लवकर पूर्ण झाल्यास नागरिकांची मोठी सोय होईल.
- मच्छिंद्र तरस, स्थानिक, किवळे

मामुर्डी, किवळे आणि सांगवडे परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता हा पूल गरजेचा आहे. प्रशासनाने काम वेळेत पूर्ण करावे.
- ॲड. शुभांगी तरस, स्थानिक, किवळे

KIW26B05765

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com