

पिंपरी, ता. ६ : आषाढी वारीहून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी (ता. ८) आळंदी येथे परतणार असून श्री तुकाराम महाराज यांची पालखी शनिवारी (ता.८) पिंपरीगाव येथे मुक्कामी असेल. ही पालखी रविवारी (ता.९) पिंपरीतून देहूगावकडे मार्गस्थ होणार आहे. यामुळे पालखी मार्गावर होणारी गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवार- रविवार या परतीच्या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.
बंद असलेले मार्ग व कंसात पर्यायी मार्ग
आळंदी मार्गावरील वाहतुकीत असा असेल बदल (शनिवार ता. ८, दुपारी दोन ते रात्री आठ)
- पुणे मार्गे आळंदीत येण्यास वाहनांना मनाई (अलंकापुरम चौक-जयगणेश साम्राज्य मोशी-चाकण तसेच चऱ्होली फाटा चौक, धानोरे फाटा चौक-मरकळ मार्गे).
- मोशी मार्गे आळंदी येण्यास (डुडुळगांव जकात नाका डावीकडे वळून केळगांव बायपास मार्गे).
- मरकळ चौक मार्गे नगरपरिषद चौक आळंदी येण्यास (मरकळ चौकातून पीसीएस चौकामार्गे/वडगांव चौक मार्गे).
- चाकण मार्गे आळंदी येण्यास (चाळीस फुटी रस्ता-वडगांव रस्ता-जिओ शोरुम-पीसीएस चौक मार्गे).
- विश्रांतवाडी-बोपखेल येथून देहूफाटा मार्गे चाकण जाण्यास (डुडुळगाव मार्गे)
(रविवार, ता. ९, सकाळी सात ते रात्री आठ)
- चाकण चौक ते प्रदक्षिणा मार्ग (चाकणकडून येणारी वाहने चाकण चौकातून घुंडरे आळीकडे न वळता देहूफाटा मार्गे तसेच पुण्याकडून येणारी वाहने चाकण रस्त्याने चाळीस फुटी रोड मार्गे).
- वडगांव चौक - प्रदक्षिणा मार्ग (वडगांव चौकातून सरळ जाण्यास बंदी- ही वाहने वडगांव रोडवरील चाळीस फुटी रोड मार्गे व जिओ शोरुम डावीकडे वळून के.के. हॉस्पिटल गल्ली- मरकळ मार्गे).
- केळगांव चौक - घुंडरे आळी चौक (चाकण रोड वरुन चाळीस फुटी रोड मार्गे).
(रविवार, ता. ८, दुपारी दोन ते रात्री आठ)
- चाकण, आळंदी फाटा ते आळंदी (आळंदी फाटा मार्गे).
- चाकण चिंबळीफाटा ते आळंदी जाण्यास (चिंबळी फाटा मार्गे).
- जयगणेश साम्राज्य चौक, मोशी ते अलंकापुरम चौक (जय गणेश साम्राज्य चौक, मोशी मार्गे).
(शनिवार ता. ८, वेळ सकाळी सात ते रात्री आठ)
- मॅग्झीन चौकाकडून आळंदीकडे येणारी वाहने विरुद्ध दिशेने मुख्य रस्त्याने व आळंदीकडून पुणेकडे येणारी वाहने बालाजी मंदिर चौकातून सेवा रस्त्याने मॅग्झिन चौकाकडे जातील.
(शनिवार, ता. ८ वेळ सकाळी नऊ ते रात्री नऊ)
- हॅरिस पुलावरुन सर्व रस्त्याने नाशिक फाटा चौकाकडे जाण्यास प्रवेश बंदी (ग्रेडसेपरेटरमधून इच्छित स्थळी जातील)
(वेळ-दुपारी दोन ते रात्री आठ)
- नशिक फाटा ते पिंपरी चौक सेवा रस्ता (डेअरी फार्म ग्रेड सेपरेटरमार्गे).
- वल्लभनगर एस.टी स्टॅण्ड अंडरपासमधून पिपरी चौकाकडे जाणारा सेवा रस्ता (वल्लभनगर एसटी स्टँड समोरील डाव्या बाजूने सेवा रस्त्याने).
- पिंपरी चौक पिंपरी पुलमार्गे शगुन चौक जाणा-या व येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना (मोरवाडी चौक मार्गे).
- गेलार्ड चौकाकडून साई चौकाकडे येण्यास (जमतानी चौकाकडे वळून).
- साई चौक ते गेलार्ड चौक अशोक थिएटर जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (साई चौक भुयारी मार्गे जुना पुणे- मुंबई महामार्ग व शास्त्री गार्डन चौकातून इच्छितस्थळी).
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डिलक्स चौकापर्यंत (जाधव वडेवाले चौकातून पॉवर हाऊस चौक मार्गे).
- काळेवाडी पुलाकडून डिलक्स चौक (पवनेश्वर मंदिर मार्गे).
- साई चौकाकडून शगुन चौक (साई चौक भुयारी मार्गातून जुना पुणे मुंबई महामार्गाकडे).
- डिलक्स चौक ते शगुन चौक-पिंपरी पुल-भाटनगर कडे (डिलक्स चौकातून साई चौकातून इच्छित स्थळी).
(रविवार, ता. ९ वेळ पहाटे चार ते दुपारी दोन)
- पिंपरीकडून लिंकरोड मार्गे चिंचवडगाव (एम्पायर एस्टेट पुलावरुन काळेवाडी मार्गे किंवा रांका ज्वेलर्समार्गे).
- ईगल हॉटेल लिंक रोड मार्गे चिंचवडगाव (दर्शन हॉल चौक उजवीकडे वळून एल्प्रो स्कूल अहिंसा चौक मार्गे).
- काळेवाडीकडून चिंचवड गावाकडे येणारा मार्ग (केशवनगर शाळेकडून डावीकडे वळून गांधी पेठ-रिव्हर व्ह्यू चौक मार्गे).
- गांधी पेठेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येणार मार्ग (गांधी पेठकडून उजवीकडे वळून केशवनगर मार्गे).
- जुना जकात नाक्याकडून चापेकर चौकाकडे (रिव्हर व्ह्यु चौक व वाल्हेकरवाडी टी जंक्शनकडून येणारी वाहने जुना जकात नाका डावीकडे वळून जैन स्कूल-बिजलीनगर मार्गे जातील).
- बिजलीनगरकडून वेताळनगर मार्गे चापेकर चौक (मोरया चौक येथून हनुमान मंदिराकडून उजवीकडे वळून सेव्हन अंरिज हॉस्पिटल येथून बिजलीनगर मार्गे).
- चिंचवड स्टेशन एसकेएफ चौक, एल्प्रो स्कूलकडून चापेकर चौक (अहिंसा चौक मार्गे लोकमान्य हॉस्पिटल चौक-चिंचवड स्टेशन मार्गे तसेच अहिंसा चौक-चापेकर उड्डाणपूल -रिव्हर व्ह्यु चौक मार्गे).
- चापेकर चौकाकडून दळवीनगर पुलाकडे जाण्यास (एस. के. एफ चौक चिंचवडकडून येणारी वाहतूक ही दळवीनगर पुलाकडे न जाता ती उजव्या बाजूने लोकमान्य हॉस्पिटल मार्गे जातील).
- दळवीनगर चौकाकडून खंडोबामाळ चौक (एस.के.एफ चौक चिंचवडकडून येणारी वाहतूक ही दळवीनगर पुलाकडे न जाता ती उजव्या बाजूने लोकमान्य हॉस्पिटल मार्गे जातील).
- खंडोबा माळ चौकाकडून दळवीनगर पूल चढतो. तेथे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई (खंडोबामाळ चौक-दळवीनगर पूल डाव्या बाजूने आकुर्डी रेल्वे स्थानक किंवा बॉम्बे सिलेक्शन मार्गे).
- चिंचवड स्टेशनकडून सरळ खंडोबामाळ चौकाकडे जाण्यास चिंचवड स्टेशनकडून येणारी वाहतूक तसेच बॉम्बे सिलेक्शनकडून येणारी वाहतूक ही ग्रिव्हीज कपंनी समोरील ग्रेडसेपरेटरमधून सरळ भक्ती शक्ती मार्गे जाईल).
- थरमॅक्स चौकाकडून खंडोबामाळ चौक (गरवारे कंपनीकडून सरळ परशुराम चौक मार्गे).
- परशुराम चौकाकडून खडी मशीन वाय जंक्शनकडे (परशुराम चौकाकडून गरवारे कंपनी मार्गे किंवा मोहननगर मार्गे इच्छित स्थळी).
- खंडोबामाळ चौक ग्रेडसेपरेटर भुयारी मार्गामधून येणारी वाहतूक तुळजा भवानी पंक्चर ग्रेडसेपरेटर मधून सेवा रस्त्याला येण्यास मनाई (खंडोबामाळ चौक ग्रेडसेपरटरमधून येणारी वाहतूक तुळजाभवानी पंक्चर ग्रेडसेपरेटमधून सरळ भक्ती शक्ती मार्गे इच्छित स्थळी जाईल).
- खंडोबामाळ चौकाकडून सेवा रस्त्याने लोकमान्य टिळक चौक निगडी येथे जाण्यास तसेच प्रेस्टिज प्लाझा पंक्चरमधून सेवा रस्ता बाहेर पडण्यास मनाई (प्रेस्ट्रीज प्लाझा ग्रेडसेपरेटमधून सरळ भक्ती शक्ती उड्डाणपूल मार्गे)
- बँक ऑफ महाराष्ट्र चौक (सद्भावना प्रतिष्ठान बस थांबाजवळ) कडून सावली हॉटेल लोकमान्य टिळक चौक ( सावली हॉटेल समोरून गांधी हॉस्पिटल मार्गे).
- लोकमान्य टिळक चौकाकडून भेळ चौकाकडे तसेच भक्ती शक्ती चौक (स्वानंद डेअरी किंवा लोकमान्य टिळक चौकाकडून डाव्या बाजूला वळून खंडोबामाळ चौकाकडे).
- अंकुश चौकडून भक्ती-शक्ती सर्कल जाणारा मार्ग (भक्ती-शक्ती ग्रेडसेपरेटर पुलाखालून निगडी पोलिस ठाणे, अप्पूघर चौक मार्गे).
- अप्पूघर चौकाकडून भक्ती शक्ती सर्कल तसेच भक्ती शक्ती चौक (अप्पूघर कॉर्नर चौक, अंकुश चौक मार्गे).
- काचघर चौकाकडून भक्ती शक्ती पूल चढतो तेथून सर्व वाहनांना मनाई (काचघर चौक सेवा रस्त्याने बसवेश्वर पुतळाकडून कृष्णा हॉटेल मार्गे).
- जुना मुंबई पुणे महामार्ग पुनागेट कडून येणाऱ्या वाहनांना भक्ती शक्ती चौकातून ट्रान्सपोर्ट नगरीकडे जाण्यास मनाई (भक्ती-शक्ती चौक शिल्पासमोरुन भक्ती-शक्ती सर्कल वरुन डाव्या बाजूने इच्छित जातील).
- रायगड हॉटेल ट्रान्सपोर्ट नगरीकडून येणाऱ्या रस्त्याने भक्ती-शक्ती चौक शिल्पासमोर जाण्यास सर्व वाहनांना मनाई (भक्ती शक्ती ग्रेडसेपरेटरमधून सरळ अंकुश चौक मार्गे).
(रविवार पूर्ण दिवस)
- जुना मुंबई पुणे महामार्गावरील सेंट्रल चौक देहूरोड येथून पुणेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद (सेंट्रल चौक-मामुर्डी- किवळे- भुमकर चौक-डांगे चौक मार्गे).
- खंडेलवाल (काळोखे पाटील चौक) ते पंरडवाल चौक बाह्यवळण मार्गे (खंडेलवाल चौक, भैरवनाथ चौक ते साईराज चौक मार्गे).
- खंडेलवाल चौक ते देहू मुख्य कमान मार्गे (खंडेलवाल चौक) ते भैरवनाथ चौक ते साईराज चौक मार्गे).
- साईराज चौक ते परंडवाल चौक मार्गे (भैरवनाथ चौक ते खंडेलवाल चौक ते साईराज चौक).
- भैरवनाथ चौक ते १४ टाळकरी कमान मार्गे (साईराज चौक-खंडेलवाल चौक मार्गे).
- देहू कमान मुंबई पुणे महामार्गाकडून देहूगाव मार्गे सर्व वाहनांना प्रवेश बंद (मुंबई पुणे महामार्गाने निगडी मार्गे).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.