नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करा

नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करा
Published on

पिंपरी, ता. ६ ः नागरिकांकडून प्राप्त झालेली विविध निवेदने व तक्रारींची प्रत्यक्ष दखल घ्या. तातडीने कार्यवाही करा, असा आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी दिला. नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून त्यांचा तातडीने निपटारा करण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दर गुरुवारी सायंकाळी ४ ते ६ ही वेळ अभ्यागतांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी निश्चित वेळ राखून ठेवली आहे. या वेळेत नागरिक त्यांच्या तक्रारी, सूचना, अडचणी तसेच विविध विषयांवरील निवेदने थेट आयुक्तांकडे सादर करू शकतात. याअंतर्गत गुरुवारी (ता. ६) आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी संबंधित विभागप्रमुख, अधिकारी यांच्यासमवेत अभ्यागतांकडून प्राप्त झालेली निवेदने स्वीकारून त्यांच्या तक्रारी आणि समस्या ऐकून घेतल्या. यानंतर प्रत्येक प्रकरणाची माहिती संबंधित विभागप्रमुखांकडून जाणून घेत त्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर तत्काळ संबंधित अधिकारी आणि विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपआयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, कार्यकारी अभियंता संतोष दुर्गे आदींसह सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

वस्तुस्थितीनिहाय आढावा
अनधिकृत बांधकामे, रस्त्यांची दुरुस्ती, अतिक्रमणे, स्मशानभूमी, क्रीडा सुविधा, शिक्षण, स्थापत्य विषयक कामे, आरोग्य सेवा, वैद्यकीय सुविधा, मालमत्ता कर, विविध विकासकामे, नावीन्यपूर्ण उपक्रम तसेच नागरिकाभिमुख योजनांशी संबंधित तक्रारी आणि निवेदनांबाबत आयुक्तांनी संबंधित विभागप्रमुखांकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. तक्रारींचे स्वरूप, त्यातील अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. ज्या प्रकरणांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. त्या प्रकरणांमध्ये संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधण्याचा आदेशही आयुक्तांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com