‘आयसीएमएआय’ मध्‍ये पिंपरी चिंचवड विद्यार्थ्यांचे यश

‘आयसीएमएआय’ मध्‍ये पिंपरी चिंचवड विद्यार्थ्यांचे यश
Published on

पिंपरी, ता. ७ ः दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्‍ट अकाउंन्‍टन्‍टस् ऑफ इंडिया (आयसीएमएआय) परिक्षेत पिंपरी चिंचवड चॅप्‍टरच्‍या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. जून २०२६ मध्‍ये झालेल्‍या माध्‍यमिक (इंटरमिडीएट) आणि अंतिम परिक्षेचा निकाल बुधवारी (ता.५) जाहीर झाला. यात माध्‍यमिक निकाल २० टक्‍के तर, अंतिम परिक्षेचा निकाल ३१ टक्‍के लागला. यात प्रज्ञा गुंजाळ, उमरखान पठाण, अक्षय ढमाले, रूपेश माळी, तेजस गोसावी यांनी कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग (सीएमए) पदवी प्राप्‍त केली. पश्चिम विभागीय अध्‍यक्ष महेंद्र भोंबे, पिंपरी चिंचवड चॅप्‍टरचे चेअरमन बाळकृष्‍ण हजारे, उपाध्‍यक्ष कुणाल वक्‍ते, प्रदीप सहस्‍त्रबुद्धे, गुरुप्रसाद कुलकर्णी, सागर मालपुरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com