

पिंपरी, ता. १३ ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोत आठ जुलै २०२६ रोजी कचऱ्याचा ढिगारा (डोंगर) ढासळला होता. त्यामुळे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची तीन मजली प्रशासकीय इमारत कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या सखोल तपासासाठी महाराष्ट्र शासनाने पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. एक महिन्यात प्राथमिक अहवाल देण्याचा आदेश सरकारने समितीला दिला आहे. शुक्रवारी (ता. १४) एक महिना पूर्ण होत असून, समितीचा प्राथमिक अहवाल अपेक्षित आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय, पिंपरी चिंचवड पोलिसांनी ११ सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी), राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) स्वतंत्र संयुक्त समिती आणि इमारतीच्या बांधकाम चौकशीसाठी महापालिका आयुक्तांनीही चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यांचेही अहवाल येत्या काही दिवसांत अपेक्षित आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.