

पिंपरी, ता. १७ : कमी वेळेत जास्त पैसे कमविण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. या कारवाईत दुचाकी चोरीचे २२ गुन्हे उघडकीस आले असून, १२ लाख ९० हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सचिन पांडुरंग मरळे (रा. जुनी सांगवी, मूळ - बारामती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना सचिन मरळे याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला चोरी केलेल्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे व पुणे ग्रामीण हद्दीत २२ दुचाकी चोरल्याचे सांगितले.
या दुचाकी त्याने दीड वर्षांपूर्वी तो इलेक्ट्रिशन कोर्स करीत असताना ओळख झालेल्या व्यक्तींना बनावट कागदपत्रे/ऑक्शन मधील बँकेच्या फायनान्सच्या ओढून आणलेल्या गाड्या असल्याचे खोटे सांगून सांगोला, अहिल्यानगर, शिरुर, बीड, रायगड जिल्ह्यातील व्यक्तींना विकल्याचे तपासात समोर आले.
या आरोपीकडून संत तुकारामनगर पोलिस ठाण्यातील पाच, पिंपरी ठाण्यातील चार, सांगवी ठाण्यातील दोन तर चतुश्रृंगी, हिंजवडी, शिरूर, दापोडी, भोसरी ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला असून, उर्वरित सहा वाहनांसंदर्भात तपास सुरू आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.