

पिंपरी, ता.५ : ‘जा सांगा मम बंधुजना...आलो जिंकुनिया या मरणा ! ‘मरण जिंकीले...येशू राजाने...’ असे विजयी गीत गायन करत चर्चमधील प्रार्थना आणि प्रवचनानंतर ‘प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे,’ अशा मोठ्या जयघोषाने ख्रिस्ती बांधवांनी रविवारी (ता.५) चर्च परिसर दणाणून सोडला. तसेच ‘हॅपी ईस्टर’ अशा शुभेच्छा एकमेकांना देत आनंदी वातावरणात पुनरुत्थानाचा दिवस म्हणजेच ईस्टर संडे उत्साहात साजरा केला. याबरोबरच पवित्र सप्ताह आणि चाळीस दिवसांच्या उपवासाचीही सांगता झाली.
विविध चर्चमध्ये ईस्टरच्या पूर्वसंध्येला शनिवारी रात्री तसेच रविवारी विशेष उपासना विधीचे आयोजन करण्यात आले. रविवारी पहाटेपासूनच सर्व चर्च भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. कामगारनगर येथील दि युनायडेट चर्च ऑफ ख्राईस्ट, पिंपरीतील अवरलेडी कन्सोलर अप्लिकेटेड चर्च, चिंचवडमधील सेंट झेवियर चर्च, काळेवाडीतील सेंट अल्फान्सो चर्च, निगडीतील इनफंट जीझस चर्च, सेंट ॲन्थोनी चर्च, काळेवाडीतील केडीसी चर्च ऑफ ख्राईस्ट, पिंपरी गावातील हिंदुस्थानी कॉन्व्हेंट, सेंट ॲण्ड्रुज आणि खडकीच्या सेंट मेरी चर्चमधून येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानचे महत्त्व सांगणारा संदेश देण्यात आला. महिलांनी पहाटेची विशेष प्रार्थना केली. चर्च व ख्रिस्ती प्रेयर ग्रुपमध्ये धार्मिक गीतांचे कार्यक्रम झाले.
देहूरोडमध्ये पुनरुत्थान रॅली
द युनायटेड पास्टर्स ॲण्ड लीडर्स ट्रस्टच्यावतीने भोसरीतील लांडेवाडी येथून तर देहूरोड पास्टर फेलोशिपच्यावतीने मुकाई चौक येथून पुनरुत्थान रॅली काढण्यात आली. यावेळी ख्रिस्ती बांधवांनी ‘आनंद करा, कारण आमचा प्रभू उठला आहे,’ अशा घोषणा दिल्या. यावेळी बिशप सॅम्युएल साखरपेकर, मायकलराज नाडार, प्रदीप चांदेकर, अनिश विजगत, डॉ. विजय फार्तडो, अशोक निकाळजे, मॅथ्यू अनमल, सुनील उबाळे, डॉ. प्रवीण रणदिवे, विधी अधिकारी ॲड. प्रसाद सांगळे, ॲड. बाजीराव दळवी आदींनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.