सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

सिग्नलची दुरूस्ती करावी
पाषाण येथील वाकेश्वर चौकाच्या पुढे पेट्रोल पंपाजवळ असलेले वाहतूक नियंत्रक दिवे मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे येथे कायम वहातूक कोंडी होते पायी चालणाऱ्‍या नागरिकांना रस्ता ओलांडताने दुरापास्त झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन वाहतूक दिवे दुरूस्त करावेत.
- चंद्रकांत खोपडे, पिंपळे सौदागर
PNE26V88104

रस्त्यावरील राडारोडा हटवा
वाकड येथील दत्त मंदिर रस्त्यावर समोर सतत वर्दळ असते. चेंबर उघडे ठेवून चेंबरची झाकणे, पाईप रहदारीस अडचण होईल अशा पद्घतीने अनेक महिन्यांपासून रस्त्यावर ठेवण्यात आले आहेत. यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. दररोज किरकोळ अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील हे साहित्य दिसत नाहीत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, शाळेतील मुले, महिला, दिव्यांग यांना धोकादायक झाले आहे. वारंवार कळवून देखील महापालिकेतून उपाय होत नाहीत.
-दिलीप बाफना, वाकड
PNE26V88105

जिल्हा रुग्णालयासमोरील चेंबर खचलेल्या अवस्थेत
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयासमोरून जाणाऱ्या जून्या पुणे-मुंबई रस्त्यावरील चेंबरचे झाकण खचले आहे, हा महामार्ग असल्याने येथून सतत वाहनांची वेगात ये जा सुरु असते. एखादे अवजड वाहन या चेंबर वरुन गेल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने येथील चेंबरची दुरूस्ती करावी.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
NE26V88103

काळेवाडीत व्यायाम साहित्याची दुरवस्था
ज्योतिबा गार्डन काळेवाडी येथे सकाळी व्यायाम करत असताना काही व्यायामाची साधने खराब झाल्याने आणि काहींना ऑईल केले नसल्याने अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे ‘गार्डन ग्रुप’ च्या सदस्यांनी येथील व्यायामाच्या साहित्याची ऑईलींग केली. महापालिकेने येथील समस्या लक्षात घेऊन या साहित्याच्या देखभाल व दुरूस्तीची व्यवस्था करावी.
- ज्ञानेश्वर मलशेट्टी, काळेवाडी
: PNE26V88106

आजारी गायीसाठी मदतीचे आवाहन
पिंपळे निलख येथील क्रांतीनगर गंगा पनामा सोसायटी समोर एक गिर गाय काल रात्री पासून आजारी पडलेल्या अवस्थेत आहे. ही गाय या येथील नाही त्यामुळे गाय गोशाळेत पाठवण्याकरिता संपर्क आणि माहिती द्यावी.
- विशाल कणसे, पिंपळे निलख
PNE26V88109

डीपीला झाडाची फांदी धोकादायक
यमुनानगर निगडी परिसरातील स्किम नंबर १० येथील ३५ नंबर बिल्डिंग मधील डिपी मध्ये झाडाची फांदी घुसली आहे. यामुळे धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने या झाडाची छाटणी करावी.
- बाबा परब, यमुनानगर
PNE26V88108

दापोडीत पदपथावर वाहनांचा विळखा
दापोडी मेट्रो स्टेशनला उतरल्यानंतर पदपथावर वाहने उभी केल्याने चालायला जागा राहत नाही. नागरिकांना जीव मुठीत धरून हायवेवरून चालावे लागते. पुढे सीएनजी पंप आहे, तेथीली वाहनेही पदपथावरच उभी केलेली असतात. प्रशासनाने पदपथावर वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी.
- ज्योती लोखंडे, दापोडी
PNE26V88107

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com