शालेय जगत

शालेय जगत

Published on

श्री टागोर शिक्षण संस्थेत विज्ञान प्रदर्शन
भोसरी येथील श्री टागोर शिक्षण संस्थेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील समस्यांवर विज्ञानाच्या आधारे शोधलेली उत्तरे प्रकल्पांतून मांडली. यात प्रामुख्याने सौर ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटी यांसारख्या विषयांवर प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सचिव सुरेश फलके, हनुमंत आगे, उद्धव ढोले, मनीषा गुरव व संतोष काळे, ‘सीवायडीए’ संस्थेचे आकाश सावरखेडे, गौरव आनंदराव उपस्थित होते. माया पाटोळे, दिलशाद मुल्ला व अविनाश बोडखे यांनी नियोजन केले. सूत्रसंचालन शरद तोरणे, यांनी तर आभार रवी खंदारे यांनी मानले.

‘सशस्त्र दलातील करिअर’विषयी मार्गदर्शन
प्रियदर्शनी शाळा, मोशी येथे विद्यार्थ्यांसाठी ‘सशस्त्र दलातील करिअर’ या विषयावर लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) समीर कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील विविध संधींबाबत माहिती दिली. सैन्य सेवेत शिस्त, समर्पण आणि देशभक्तीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. एनडीए, सीडीएस, एएफसीएटी अशा विविध प्रवेश परीक्षांची माहिती देण्यात आली. शारीरिक तंदुरुस्ती, नेतृत्वगुण आणि मानसिक कणखरतेवर त्यांनी विशेष भर दिला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत अनेक प्रश्न विचारले.

प्रियदर्शनी शाळेत शिक्षकांचे प्रशिक्षण
मोशीतील प्रियदर्शनी स्कूल येथे ‘हॅपी क्लासरूम’ विषयावर शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. आनंदी व तणावमुक्त शिक्षण वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी प्रशिक्षक शिल्पा गुजारे व मनीषा काळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा आनंद, भावनिक स्वास्थ्य आणि सक्रिय सहभाग वाढवणाऱ्या नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतींवर प्रशिक्षणात भर देण्यात आला. शिक्षक-विद्यार्थी नातेसंबंध सकारात्मक कसे ठेवावेत आणि सहानुभूती व सर्जनशीलतेने वर्गव्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संस्थेचे मानद जनरल सेक्रेटरी ॲड. राजेंद्रकुमार मुथा, अनिलकुमार कांकरिया यांनी मार्गदर्शन केले.

शिशुविहारात शेकोटी कार्यक्रम
श्री जैन विद्या प्रसारक मंडळ, संचालित श्री गुरुमैय्या प्रभाकंवरजी शिशुविहार या विभागात शेकोटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त जयप्रकाश बन्सीलाल राका, रेखा राका, क्षमा राका यांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन नीलिमा अनपट यांनी केले. शिशुविहार विभाग प्रमुख रेखा पितळीया, उषा कदम, निशा लखदिवे व सर्व शिक्षकांनी नियोजन केले. मुख्याध्यापक जयप्रकाश दहिफळे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम झाला.

गोलांडे विद्यालयात सामुदायिक सूर्यनमस्कार
कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालय, चिंचवड येथे सामुदायिक सूर्यनमस्कार व ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानांतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुख्याध्यापिका उज्ज्वला चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी सामुदायिक पुस्तक वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानंतर सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सूत्रसंचालन असलम अली शेख यांनी केले.

मुथा कन्या प्रशालेत मतदार दिवस
सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेत राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे मानद सचिव राजेंद्रकुमार मुथा, अनिलकुमार कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या. निवडणूक आयोगाची स्थापना, कार्य याबाबत प्राचार्या सारंगा भारती यांनी माहिती दिली. विजयाराणी गडचे यांनीदेखील या प्रसंगी विद्यार्थिनींना माहिती सांगितली. यानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम-जान्हवी घाडगे, व्दितीय-समिक्षा साखरे, तृतीय क्रमांक प्रांजल मिस्त्री यांनी मिळवला. कलाशिक्षक रमेश कुत्तरवाडे, प्रदीप घोटकुले व सुवर्णा भुजबळ व उमा शेटे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. उपमुख्याध्यापिका सुषमा बंब, पर्यवेक्षक शशिकांत हुले, शिक्षक प्रतिनिधी विजयाराणी गडचे, पायल कांबळे, सुवर्णा भुजबळ, उमा शेटे, वैशाली जाधव, वैशाली चुंगे, हरीश शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन संध्याराणी धुमाळ यांनी केले.

स्काऊट्स गाईड जिल्हा मेळाव्याची पूर्वतयारी
श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चिंचवड येथे जिल्हा मेळावा पूर्वतयारी सभा नुकतीच आयोजित करण्यात आली. हा मेळावा ३१ जानेवारी ते एक फेब्रुवारी या काळात होत आहे. या सभेस प्राचार्य सुनीता नवले, सारंगा भारती, लिंभोर मॅडम, विक्रम काळे, सतीश भारती, रफेल जॉन स्वामी, विजयकुमार जोरी, मिलन जाधव, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त शमा शिकलगार, प्रशिक्षण समुपदेशक स्नेहल पाटोळे, अंजु सोनवणे, संजीवनी मुळे, अनघा दिवेकर, मीनाक्षी मेरुकर आदी उपस्थित होते.
स्काऊट जिल्हा संघटक दिगंबर करंडे यांनी मेळावा आयोजनाबाबत प्रास्ताविक केले, आभार जिल्हा संघटक गाईड उषा हिवराळे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com