''पुणे ग्रँड चॅलेंज टूर'' मुळे शहर परिसरातील वाहतूक मार्गात बदल

''पुणे ग्रँड चॅलेंज टूर'' मुळे शहर परिसरातील वाहतूक मार्गात बदल

Published on

उद्योगनगरीत वाहतूक मार्गांत उद्या मोठा बदल
‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’; विविध ९३ रस्ते सकाळी ९ ते सायंकाळी ६ बंद

पिंपरी, ता. २१ : पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह लगतच्या ग्रामीण हद्दीत मंगळवारपासून आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धा सुरू झाली आहे. स्पर्धेचा चौथा टप्पा शुक्रवारी (ता. २३) आहे. हा मार्ग पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील मार्गामुळे ९३ ठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. स्पर्धा होणाऱ्या भागांत काही मार्ग बंद ठेवले जाणार असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. हा बदल शुक्रवारी (ता. २३) सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेसाठी असेल.

वाहतूक बदल (बंद मार्ग व कंसात पर्यायी मार्ग)
१. बालेवाडी-औंध रस्ता परिसर
- नांदे बालेवाडी रस्त्याकडून राधा चौक (शितळादेवीनगर येथून छत्रपती शिवाजी स्टेडियम रस्त्याने वळवून पीआयसीटी स्कूल समोरून मुंबई बंगळुरू महामार्ग)
- बंटारा भवनकडून सेवा रस्त्याने राधा चौकाकडे (ज्ञाती शोरूम समोरून वळवून मुंबई-बंगळुरू महामार्ग)
- ऑर्किड हॉटेल सेवा रस्त्याने राधा चौक (ऑर्किड हॉटेलसमोरुन वळवून मुंबई-बंगळुरू महामार्ग)
- औंध डी-मार्टकडून ढोरे पाटील चौक (नागर्स चौकमार्गे)

२. औंध-रावेत बीआरटी रस्ता परिसर
- टकले चौकाकडून रक्षक चौक (नवीन डीपी रस्त्याकडून)
- बापुजी बुवा मंदिर चौक-बापूराव कामठे-चौक रक्षक चौक (लोटस आणि लिली सोसायटी रोडमार्गे)
- जगताप चौकाकडून वाय-जंक्शनकडे येणार मार्ग (डीपी रस्त्याने टकले चौकाकडे)
- जगताप डेअरी चौक-कस्पटे चौक सेवा रस्त्याने चौकाकडे येणारा मार्ग (अंडरपासचा वापर करुन जाता येईल)
- जगताप डेअरी चौक-शिवार चौक सेवा रस्त्याने चौकात येणारा मार्ग (अंडरपासचा वापर करुन इच्छितस्थळी जाता येईल)
- छत्रपती चौकाकडून काळेवाडी फाटा (छत्रपती रस्ता ते दत्त मंदिर रस्ता)
- काळेवाडी फाटा, मदर तेरेसा पुलाखालून पुलावर येण्यास सर्व वाहनांना मनाई (सेवा रस्त्याने जुना मुंबई-पुणे महामार्ग)
- सांगवी फाटा- औंध रुग्णालय- गजानननगर- शनिमंदिर फाटा येथून बीआरटी रस्ता (जुनी सांगवी पाण्याची टाकी येथील रस्त्याने)
- औंध रुग्णालय ते बीआरटी रस्ता (पीसीएच कॅम्पस रस्ता)
- गजानननगर पंक्चर बा. रा. घोलप महाविद्यालय जाणारा रस्ता (फेमस चौकमार्गे)
- शनिमंदिर फाटा बा. रा. घोलप महाविद्यालयकडे येणार रस्ता (फेमस चौकमार्गे)
- वाकड वाय जंक्शन येथील कस्पटे चौक विशालनगरमार्गे राजीव गांधी पुलाकडे जाणारा-येणारा मार्ग (जगताप चौक येथे उजवीकडे वळून डीपी रस्त्याने तसेच कस्पटे चौक येथून डावीकडे जगताप डेअरी अंडरपास, कोकणे चौक मार्गे)
- कस्पटे वस्तीकडून काळेवाडी फाटा (छत्रपती चौक येथून डावीकडे वळून पिंक सिटी रस्त्याने तसेच मानकर चौक येथून जगताप डेअरी अंडरपास कोकणे चौकमार्गे)
- काळेवाडी फाटा येथून डांगे चौकाकडे (दत्त मंदिर रस्ता (गुजर चौक) येथून उजवीकडे वळून दत्त मंदिर रस्त्याने)
- ताथवडे अंडरपासकडून ताथवडे गाव (माजी खासदार नवले यांच्या निवासस्थानापासून उजवीकडे व डावीकडे वळून जाता येईल)
- पुनावळे गावाकडून पुनावळे टीम जंक्शन (बुद्ध विहार येथून उजवीकडे वळून)
- हँगिंग ब्रिज चौक ते रावेत (रावेत चौक येथे यू टर्न करुन तसेच हँगिंग ब्रिज चौकाजवळून डावीकडे वळून)
- धनलक्ष्मी ज्वेलर्स चौकातून हँगिंग ब्रिज चौक (धनलक्ष्मी ज्वेलर्स चौकातून संविधान चौकमार्गे)
- वाल्हेकरवाडी फाटा (भोंडवे कॉर्नर) येथे वाल्हेकर वाडीकडून येणारा मार्ग (वाल्हेकरवाडी येथून बिजलीनगर ब्रिजमार्गे तसेच वाल्हेकरवाडी नवीन ब्रिज येथे यू टर्न करून)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे अरिहंत डेंटल क्लिनिककडून जाणारा मार्ग (अरिहंत डेंटल क्लिनिककडून पर्यायी मार्ग)
- राजयोग कॉलनी रस्त्याने रावेतगाव रस्ता (जवळील कॉलनीमधून पर्यायी मार्ग)
- रावेत इस्कॉन मंदिर/गुरुद्वाराकडून धर्मराज चौक (आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील अंडरपास, इस्कॉन मंदिर रस्ता तसेच भक्ती शक्ती ते मुकाई चौक रस्ता)

३. काळेवाडी फाटा-चिखली बीआरटी रस्ता परिसर
- काळेवाडी लकी बेकरीकडून एम. एम. चौक व नढे कॉर्नर (साधू वासवानी रस्त्याने जाता येईल)
- नढे कॉर्नर बाजूकडून विजयनगर बस थांबा (विजयनगर रस्त्याने जाता येईल)
- पाचपीर चौकाकडून एमएम चौक (नढेनगर रस्त्याने जाता येईल)
- न्यू राज बॅटरी चौक ते एमएम चौक (काळुराम शिंदे रस्त्याने जाता येईल)
- ज्योतिबानगर चौक ते एमएम चौक (तापकीर मळा चौकमार्गे)
- गणेश मंदिर चौकमार्गे तापकीर मळा व तापकीर चौक येण्यास मनाई (गोडांबे चौक मार्गे)
- अभिमान चौक ते एमएम चौक (अंतर्गत पर्यायी मार्गाने)
- थेरगाव येथील दिलीप वेंगसकर ॲकॅडमी चौक ते थेरगाव तापकीर चौक (थेरगाव मार्गे डांगे चौक)
- बारणे चौक थेरगाव तापकीर चौकाकडे जाणारी वाहने (थेरगाव मार्गे डार्गे चौक)
- नखाते चौकाकडून कुणाल हॉटेल व रहाटणी फाटा येथे बीआरटी रस्ता (छत्रपती चौकाकडून महादेव मंदिर पिंपळे सौदागर मार्गे स्वराज गार्डन चौकमार्गे)
- गोडांबे चौक नखाते चौकाकडून रहाटणी फाटा (स्वराज गाईन चौकाकडून)
- धनगर बाबा मंदिर बीआरटी मार्गे (स्वराज गार्डन चौकाकडून)
- काळेवाडी फाटा सेवा रस्त्याने काळेवाडी फाट्याकडे (स्वराज गार्डन चौकाकडून)

४. निगडी आकुर्डी प्राधिकरण परिसर
- आकुर्डी रेल्वे स्टेशन तसेच पी.सी.बी कॉलेजकडून के सदन चौक (आकुर्डी रेल्वे स्टेशनकडून डावे बाजूने आकुर्डी पोलिस चौकीकडून तसेच
पीसीबी कॉलेज येथून नवीन धर्मराज महाराज पुलमार्गे)
- आकुर्डी पोलिस चौकी तसेच गणेश तलावाकडून हुतात्मा चौक (गणेश तलाव मार्गे नवीन धर्मराज महाराज पुलाकडून)
- निगडीतील अप्पूघर कॉर्नर ते स्वामी विवेकानंद चौक (मुकाई चौक मार्गे)
- स्वामी विवेकानंद चौक ते भेळ चौक (संभाजी चौकमार्गे बिजलीनगर तसेच अप्पू घर चौकातून मुकाई चौक मार्गे)
- लोकमान्य रुग्णालय ते भेळ चौक (लोकमान्य टिळक चौक तसेच म्हाळसाकांत चौक मार्गे)
- गोकुळ सुपरमार्केट ते काच घर चौक (कृष्णा हॉटेल-अप्पू घर-मुकाई चौक मार्गे)
- गांधी नर्सिंग होम बाजूकडून काच घर चौक (निगडी चौक (सावली हॉटेल) लोकमान्य टिळक चौक मार्गे)
- वृंदावन बंगला ते शांतिसागर महाराज चौक (कृष्णा हॉटेल मुकाई चौक मार्गे)
- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सेवा रस्ता तसेच मुख्य रस्त्याने भक्ती सर्कलवर येण्या-जाण्यास मनाई (हॉटेल पूना गेट येथून भक्ती शक्ती उड्डाणपुलावरून तसेच पुणे बाजूकडून येणारी वाहने भक्ती शक्ती उडाणपुलमार्गे तसेच लोकमान्य टिळक चौक मार्गे)
- अप्पू घर बाजूकडून भक्ती शक्ती सर्कल अंडरपासमार्गे त्रिवेणीनगर चौक (मुकाई चौक तसेच पुणे गेट मार्गे भक्ती शक्ती उड्डाणपूलमार्गे)
- साईनाथनगर तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत प्रवेशद्वार मार्गे अंकुश चौकात येणार मार्ग (अंतर्गत रस्त्याने लोकमान्य टिळक चौक मार्गे तसेच चांदतारा चौक रुपीनगरमार्गे)

५. निगडी भोसरी स्पाइन रस्ता परिसर
- यमुनानगर तसेच लहुजी साळवे प्रवेशव्दारातून चिकन चौकात येणारा मार्ग (बापू घोलप कार्यालया समोरुन नॅशनल गॅरेजमार्गे तसेच अंतर्गत रस्त्याने लोकमान्य टिळक चौक मार्गे)
- तळवडे तसेच संविधान चौकाकडून त्रिवेणीनगर चौक (तळवडे कडून येणारी वाहने टायर लाइनमार्गे तसेच संविधान चौकाकडून येणारी वाहने कृष्णानगर भाजी मंडईमार्गे)
- संतनगर चौक येथून सिद्धिविनायक चौक (संतनगर चौक (स्पाइन रोड) येथून पुणे-नाशिक महामार्गमार्गे)
- सुधांशु असोसिएट्स येथून व साळुंखे वजन काटा येथून आरके फिटनेस चौक (सुधांशू असोसिएट्स येथून विश्वेश्वर चौक खंडेवस्ती मार्गे क्रांती चौक येथून गोल्ड जिम मार्गे तसेच साळुंखे वजन काटा येथून विश्वेश्वर चौक खंडेवस्ती मार्गे क्रांती चौक येथून गोल्ड जिम मार्गे)
- संतनगर चौक येथून एमआयडीसी पोलिस स्टेशन चौक (संतनगर चौक (स्पाईन रोड) येथून पुणे नाशिक महामार्गामार्गे )
- अन्सारी टी स्टॉल टी पॉइंट येथून व अल्ट्रा कॉरपोटेक येथून स्पाइन सिटी मॉल चौक (अन्सारी टी स्टॉल टी पॉइंट येथून पुणे नाशिक महामार्गमार्गे तसेच अल्ट्रा कॉरपोटेक येथून क्रांती चौक येथून गोल्ड जिम मार्गे)
- फ्लाइंग सिटी चौक येथून च एक्सलेन्ट प्री स्कूल टी पॉइंट येथून सरदार चौक (फ्लाइंग सिटी चौक येथून मोशी भाजी मंडई मार्गे पुणे नाशिक महामार्गमार्गे तसेच एक्सलेन्ट प्री स्कूल टी पॉइंट येथून विश्वेश्वर चौक खंडेवस्ती मार्गे)
- गोल्ड जिम येथून क्रांती चौक (मोशी भाजी मंडई मार्केट मार्गे पुणे नाशिक महामार्गमार्गे)
- छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जाधव सरकार चौक (छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून देहू आळंदी किंवा पुणे नाशिक महामार्गमार्गे)
- डायमंड चौक येथून व चेरी चौक येथून कुदळवाडी सर्कल चौक (डायमंड चौक येथून देहू आळंदी रस्ता तसेच चेरी चौक येथून कृष्णानगर भाजी मंडई चौक मार्गे सानेचौक मार्गे)

६. निगडी-भोसरी टेल्को रस्ता परिसर
- हत्ती चौक तसेच यमुनानगर चौकीकडून दुर्गानगर चौक (लोकमान्य टिळक चौक तसेच शनिमंदिर मार्गे)
- गरवारे कंपनी व कस्तुरी मार्केट बाजूकडून थरमॅक्स चौक (खंडोबामाळ तसेच कृष्णानगर भाजी मंडई मार्गे)
- थरमॅक्स चौक ते बर्ड व्हॅली चौक मार्गे निगडी भोसरी मार्गावर येण्यास मनाई (अंतर्गत रस्त्याने जाता येईल)
- रामनगर ते बर्ड व्हॅली चौक (परशुराम चौक मार्गे)
- एचडीएफसी कॉर्नरवरुन निगडी भोसरी रस्ता (घरकुल चौक मार्गे)
- केएसबी चौक, म्हसोबा मंदिर येथून आयुक्त बंगला चौकाकडे येणारा रस्ता (बसवेश्वर चौक मार्गे महावीर चौकमार्गे)
- बसवेश्वर चौकातून राजमाता जिजाऊ चौक (केएसबी चौकाकडून येणारी वाहतूक बसवेश्वर मार्गे महावीर चौकामार्गे)
- नटराज ग्लास कंपनीकडून आयुक्त बंगला चौक (नटराज ग्लास कंपनीकडून मोरवाडी जुने न्यायालय चौक मार्गे)
- आनंदधाम स्मशानभूमी चौकातून राजमाता जिजाऊ चौक ( आनंदधाम स्मशानभूमी चौकाकडून जुने मोरवाडी न्यायालय चौक)
- कोहिनूर वर्ड टॉवर येथून एम्पायर इस्टेट सोसायटीकडे जाणारा रस्ता (कोहिनूर वर्ड टॉवर येथून मदर टेरेसा पुलाखालून मोरवाडी चौक मार्गे)
- डी मार्टकडून सायन्स पार्ककडे येण्यास अथवा मदर टेरेसा पुलावर जाण्यास मनाई (मदर टेरेसा पुलाखालून मोरवाडी चौकामार्गे)
- पूर्णानगर येथून बर्ड व्हॅली रेस्टॉरन्ट चौक टेल्कोरोड (चेरी चौक (स्पाइन रोड) येथून डाव्या बाजूस वळून कृष्णानगर भाजी मंडई चौकमार्गे)
- कुदळवाडी सर्कल स्पाइन रस्ता येथून केएसबी चौक (कुदळवाडी सर्कल पुला खालून चेरी चौक मार्गे कृष्णानगर भाजी मंडई चौक मार्गे)
- पिंपरी न्यायालयाकडून व क्रांती चौक स्पाइन रस्ता येथून यशवंतनगर चौक (टाटा मटेरियल गेट समोरुन क्रांती चौक येथून गोल्ड जिम मार्गे व वल्लभनगर मार्गे मुंबई पुणे महामार्गमार्गे)
- टेल्को रस्त्याने टूल टेक इंजिनियर्स समोरील टी पॉइंट निगडी-भोसरी रस्ता (विश्वेश्वर चौक खंडेवस्ती चौक मार्गे क्रांती चौक पुढे गोल्ड जिम मार्गे)
- भोसरी एमआयडीसी रस्त्याने व अण्णासाहेब मगर स्टेडियम रस्त्याने अनुकूल चौक (विश्वेश्वर चौक खंडेवस्ती चौक मार्गे क्रांती चौक पुढे गोल्ड जिममार्गे तसेच अण्णासाहेब मगर स्टेडियम चौक येथून नेहरूनगर मार्गे)
- भोसरीतील जय हनुमान मंदिर चौक गवळीमाथा टी पॉइंट (विश्वेश्वर चौक खंडेवस्ती चौक मार्गे क्रांती चौक पुढे गोल्ड जिम मार्गे)
- माउली वॉशिंग ॲण्ड सॅनिटायझिंग सेंटर चौक येथून बालाजीनगर चौक (डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालय नेहरूनगर मार्गे)

७. इंद्रायणीनगर भोसरी प्राधिकरण परिसर
- हॉटेल गुरुकृपा चौक येथून व भोसरी येथून इंद्रायणीनगर कॉर्नर चौक (नेहरूनगर मार्गे मुंबई-पुणे महामार्ग तसेच भोसरी येथून येणारी वाहतूक ही पुणे-नाशिक महामार्ग)
- ईएसए कॉर्नर चौक येथून मसाला काटा टी पॉइंट (ईएसए कॉर्नर चौक येथून विश्वेश्वर चौक खंडेवस्ती मार्गे क्रांती चौक येथून गोल्ड जिम, मार्गे)
- पुणे फोर्ज कॉर्नर चौक येथून हॉटेल टिप टॉप टी पॉइंट (भोसरी पुणे-नाशिक महामार्ग )
- श्रीराम ताडपत्री चौक येथून, हॉटेल आशया सोसायटी रस्ता व मित्रा पंडीत सर्विस याय जंक्शन येथून इंद्रायणीनगर स्वीट कॉर्नर चौक येथे येणारा मार्ग (विश्वेश्वर चौक खंडेवस्ती मार्गे क्रांती चौक येथून गोल्ड जिम मार्गे तसेच एमआयडीसी पोस्टेकडे जाणारा रस्ता येथून विश्वेश्वर चौक खंडेवस्ती मार्गे क्रांती चौक येथून गोल्ड जिम मार्गे पुणे नाशिक महामार्गमार्गे)
- वीर हनुमान मित्र मंडळ चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशव्दार मुख्य रस्ता मार्ग (विश्वेश्वर चौक खंडेवस्ती मार्गे क्रांती चौक येथून जिम मार्गे)
- मास्टर टेलर टी पॉइंट चौक येथून रामकृष्ण मोरे प्रवेशव्दार मार्ग (एमआयडीसी पोस्टेकडे जाणारा रोड येथून विश्वेश्वर चौक खंडेवस्ती मार्गे क्रांती चौक येथून गोल्ड जिम मार्गे)
- श्रीनाथ ऑटो गॅरेज टी पॉइंट येथून मल्हार टी कॉर्नर चौक (नाशिक पुणे महामार्गमार्गे)
- भोसरीकडून एस.एन.एस जिम टी पॉइंट मार्ग (नाशिक पुणे महामार्गमार्गे)
- स्वामी विवेकानंद रस्ता येथून मॅन्जिनिज केक शॉप वैष्णव माता मार्गावरील टी पॉईट (नाशिक-पुणे महामार्गमार्गे)
- मास्टर टेलर टी पॉइंट येथून साई चौक (विश्वेश्वर चौक खंडेवस्ती मार्गे क्रांती चौक येथून गोल्ड जिममार्गे)
- प्रथमेश व्हिला एल पॉईट येथून श्री वैष्णव माता मंदिर टी पॉइंट वैष्णव माता मार्ग (नाशिक-पुणे महामार्गमार्गे)
- लवारे असोसिएट्स टी पॉईट येथून न्यू गणेश ज्वेलर्स टी पॉइंट वैष्णव माता मार्ग (नाशिक-पुणे महामार्गमार्गे)
- प्रोक्सीमा मॉल चौक येथून व पॉवर फॅक्टरी जिम टी पॉइंट येथून सहारा चौक (प्रोक्झिमा मॉल चौक येथून तसेच पॉवर फॅक्टरी जिम टी पॉइंट येथून विश्वेश्वर चौक खंडेवस्ती मार्गे क्रांती चौक येथून गोल्ड जिममार्गे)
- ओम निखिल इंजिनिअरिंग कंपनी चौक येथून श्रीकृष्णपुरम सोसायटी टी पॉइंट (ओम निखिल इंजिनिअरिंग कंपनी चौक येथून नाशिक पुणे महामार्गाने)
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com