पायाभूत सुविधांसाठी १९५ कोटींचा निधी

पायाभूत सुविधांसाठी १९५ कोटींचा निधी

Published on

पिंपरी, ता. २१ : ‘पुणे ग्रँड टूर-२०२६’ साठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी १९४ कोटी ८८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मानकांनुसार ‘पीएमआरडीए’ हद्दीत मुळशी-मावळ, भोर, वेल्हे, पुरंदर, हवेली तसेच पुरंदर-बारामती तालुक्यांतील १६८ किलोमीटर रस्त्याचे काम दर्जेदार करण्यात आले आहे. यामध्ये रस्ते व पूल दुरुस्ती, मजबुतीकरण, रंगरंगोटी, दिशादर्शक व माहिती फलक, रस्ते स्वच्छता तसेच सुरक्षिततेशी संबंधित पूरक कामांचा समावेश आहे. या सर्व विकासकामांना मुख्यमंत्री व ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय मान्यता दिली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एकूण १७ महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
या स्पर्धेत जगभरातील ऑलिम्पिक स्तरावरील खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे पुणे व महाराष्ट्रासह भारताचे क्रीडा, पर्यटन आणि सांस्कृतिक सामर्थ्य जागतिक पातळीवर अधिक ठळकपणे अधोरेखित झाले आहे, असे प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com