

पिंपरी, ता. २२ ः ज्येष्ठ महिलांची सोनसाखळी चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील तीन महिलांना गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने तासाभरात जेरबंद केले. निगडीतील टिळक चौकाजवळील बसथांब्याजवळ कारवाई केली. महिलांकडून दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व गंठण जप्त केले. त्यांच्याविरुद्ध कर्नाटकातील अफजलपूर, गुलबर्गा, विजयपुरा तसेच महाराष्ट्रातील परभणी, दादर, कुर्ला येथे चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने दुसऱ्या एका कारवाईत घरफोडी करणाऱ्या एका आरोपीसह त्याला चोरीचे सोने विकण्यास मदत करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. त्यांनी दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे दोन गुन्ह्यांची कबुली दिली. तिच्याकडून दोन्ही गुन्ह्यांतील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.