शिक्षणाबरोबरच परदेशी फुलशेती

शिक्षणाबरोबरच परदेशी फुलशेती
Published on

सोमाटणे, ता. २४ ः आधुनिक तंत्रज्ञानाने परदेशी फूल शेती करून शिक्षणाबरोबर शेतीतून पैसा कमावण्याचा अनोखा मार्ग चांदखेड येथील प्रथमेश गायकवाड या शेतकऱ्याने शोधला. मावळातील शेतकऱ्यांच्या बरोबर आपले आईवडील हे मुख्य पीक भाताच्या उत्पन्नाबरोबर ऊस, धान्य, भाजीपाला कडधान्य, फुले आदींची शेती करत. ही पिके शेतकऱ्यांची फारशी आर्थिक प्रगती वाढवणारी ठरत नव्हती. शेतीच्या पिकातून फारसा नफा मिळत नव्हता. तो केवळ गरजा भागवण्यापुरता होता.
प्रथमेश सध्या विज्ञान शाखेच्या पदवीच्या शेवटच्या वर्गाचे शिक्षण घेत आहे. त्याने सेंद्रिय पद्धतीने परदेशी फुलशेतीकडे लक्ष वळवले. यासाठी त्याने परदेशी फुलशेतीत तज्ज्ञ असलेले मामा प्रशांत गावडे यांची मदत घेतली. एक एकर शेतात शिलोसीया, मेट्रीला ट्रिकेलिया जातीच्या ७५ हजार विविधरंगी परदेशी फुलांच्या रोपांची लावणी त्याने केली. परदेशी फुलांना दिवसाचे किमान सोळा तास प्रकाशाची गरज असते. यासाठी कृत्रिम प्रकाश, आवश्यकतेप्रमाणे सेंद्रिय खते व कीटकनाशकांचा वापर केल्याने फुलांची वाढ अधिक वेगाने झाली. सध्या फुले कापणीला आली आहेत.
या फुलांची विक्री परदेशात होते. हडपसर येथील आर. पी. अॅग्रो सर्व्हीसेस या कंपनीच्या मदतीने फुले परदेशात पाठवली जातात. या फुलांना बाजारभाव चांगला मिळत असून सध्या पाच फुलांचा एक गुच्छ शंभर रुपये किमतीला जातो. फुलाचे हे पीक अडीच महिन्यांत येते. त्यामुळे या फुलशेतीतून एकरी किमान पाच ते सात लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असून खर्च वजा जाता चार ते पाच लाख रुपये शिलकीचे उत्पन्न मिळण्याची खात्री त्याला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------
88993

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com