दुचाकीच्या धडकेत
पिता पुत्र जखमी

दुचाकीच्या धडकेत पिता पुत्र जखमी

Published on

पिंपरी, ता. २३ : मागून अज्ञात दुचाकीने जोरात धडक दिल्याने दुचाकीवरील पिता-पुत्र जखमी केले. ताथवडे ते भूमकर चौका दरम्यानच्या रस्त्यावर हा अपघात झाला. या प्रकरणी पुष्पेंद्र सुवेकुमार बिश्वकर्मा (रा. अग्रवाल हाईट्स, ताथवडे, मूळ रा. मध्य प्रदेश) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दुचाकीचालकावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी व त्यांचे वडील मंगळवारी (ता. १३) सकाळी दुचाकीवरून कामावर जात होते. त्यांचे वडील दुचाकी चालवत होते. मागून दुचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दोघेही खाली पडले. त्यांच्या डोके आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर आरोपी पसार झाला. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com