औद्योगिक टी-ट्वेंटी क्रिकेट
पिंपरी, ता.२५ ः औद्योगिक क्रीडा संघटनेच्यावतीने आयोजित ६२ व्या औद्योगिक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत
‘टीकेआयएल’ आणि एन्प्रो इंडस्ट्रीज संघ विजयी झाले. ‘टीकेआयएल’चा निखिल गुप्ता, टाटा टेक्नॉलॉजीचा देवेंद्र पंडित हे सामनावीर ठरले.
ॲम्युनिशन फॅक्टरीच्या क्रीडांगणावर सकाळच्या सत्रात ‘टीकेआयएल’ने म्युनिशन्स इंडियावर ९ विकेट राखून विजय मिळविला. पराभूत संघाच्या मयूर वेदपाठकचे अर्धशतक व्यर्थ ठरले. दुपारच्या सत्रात टाटा टेक्नॉलॉजीवर एन्प्रो इंडस्ट्रीज संघाने २ विकेट राखून पराभूत केले. या सामन्यात पराभूत संघाच्या अक्षय ताम्हाणे याने चौफेर फलंदाजी करत अर्धशतक झळकाविले.
संक्षिप्त धावफलक
म्युनिशन्स इंडिया ः १८.५ षटकांत सर्वबाद ८८ - मयूर वेदपाठक ५६ (निखिल गुप्ता ४-१६) पराभूत वि.
टीकेआयएल ः ७.२ षटकांत १ बाद ८९ - नितीन शेट्टी ३१, सचिन कांगरकर ४८.
टाटा टेक्नॉलॉजी ः २० षटकांत ७ बाद १५६ - अक्षय ताम्हाणे ५०, योगेश धायबर ३२ (गुरुशांत जावरगे २-३७, आशिष शिंदे २-२०) पराभूत वि. एन्प्रो इंडस्ट्रीज ः २० षटकांत ८ बाद १५९ - सक्षम धांडे ४५, राहुल कुंभार ४७ (देवेंद्र पंडित ३-२७, के. कश्यप २-१८) .
थरमॅक्स ः २० षटकांत ५ बाद १०१ - कार्तिक हिलाल १८, अमित सिंग ३४, सुशील मालुसरे २९ (शाहबाझ सय्यद २-१४, रुतव मेहता २-२२) पराभूत वि. एमक्युअर फार्मास्युटिकल्स ः १२.४ षटकांत ५ बाद १०३ - शाहबाझ सय्यद ३१, गौरव शेलार १५ (कार्तिक हिलाल ३-१३).
किर्लोस्कर ब्रदर्स ः २० षटकांत ९ बाद १२३ - अतुल सरोदे २७ (ज्ञानेश्वर चांदेवार २-२९, धर्मेंद्र बिश्त २-२०, ३-१६) वि.वि. डीओडी ः २० षटकांत ९ बाद ११५ - सुभाष दाभाडे ३१, राजवीर महला २३ (संतोष दिघे २-३६, कार्तिक कुलकर्णी २-११, अमित डबीर ३-१८).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

