स्काय i - महाराष्ट्र सरकारमध्ये करार
पुणे, ता. २४ ः स्काय i आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे बायोपॉलीमर नवोपक्रम आणि पेटंटला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय स्काय i चे महाराष्ट्राच्या दीर्घकालीन विभागीय विकासाच्यादृष्टिने रिअल इस्टेटमधील योगदान आणखी भक्कम होणार आहे.
सकाळ माध्यम समुहाने स्वित्झर्लंडमधील झुरीक येथे आयोजित केलेल्या ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या वतीने या करारास मूर्त स्वरूप देण्यात आले.
दृष्टिक्षेपात
- सहभागी संस्था ः स्काय i - महाराष्ट्र सरकार
- स्वरूप ः पुण्यातील केंद्रात नवोपक्रम, संशोधन आणि विकासावर ५० दशलक्ष युरोच्या घरात गुंतवणूक
- कालावधी ः ५ वर्षे
- उद्दिष्टे ः शाश्वत बायोपॉलीमर, बौद्धिक संपदा बळकटी आणि प्रगत उत्पादनाला पाठिंब्यासाठी संशोधन-विकासाला गती देणे
- नवोपक्रमाचे टप्पे ः पाच वर्षांत दहापेक्षा जास्त नवी पेटंट, ४० पेक्षा जास्त पेटंटची यापूर्वीच निर्मिती, पुण्यात संशोधन-विकास आणि नवोपक्रम समर्पित केंद्र
- फलनिष्पत्ती ः जागतिक दर्जाच्या उत्पादनाचा नवोपक्रम, कौशल्य विकास आणि नवोपक्रमावर आधारित प्रगती
---
स्काय i ची महाराष्ट्रातील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक
- पनवेल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आणि पुण्यात तीन एकात्मिक वसाहती
- आगामी काळात दहा हजारांपेक्षा जास्त घरे
- अंदाजे दहा दशलक्ष चौरस फूट विकासाची क्षमता
- दहा हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती
---
विभागीय विकास
ठिकाण ः भूभाग ः विकासाला वाव
मुंबई ३ ः १०० एकर ः आदरातिथ्य, शिक्षण, क्रीडा सुविधा आणि गृहबांधणी असलेली एकात्मिक वसाहत
भूगाव ः १०० एकर ः आदरातिथ्य, शिक्षण, क्रीडा सुविधा आणि गृहबांधणी असलेली एकात्मिक वसाहत
भुकूम ः १०० एकर ः व्हिला निर्मिती
---
आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक सुरू ठेवली आहे. राज्याच्या आर्थिक आणि पर्यावरणीय प्राधान्यकमाला पूरक असलेले शाश्वत उत्पादन आणि नगर विकासासाठी आम्ही दीर्घकालीन क्षमता निर्मिती करीत आहोत. त्यास या करारामुळे आणखी चालना मिळेल.
- अभिजित जगताप, संचालक, स्काय i
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

