मोशीतील न्यायसंकुलात ३६ न्यायालये करणार

मोशीतील न्यायसंकुलात ३६ न्यायालये करणार

Published on

पिंपरी, ता. २५ : ‘‘मोशी सेक्टर १४ मधील १५ एकर जागेमध्ये न्यायसंकूल इमारत बांधकाम आराखड्यानुसार २५ न्यायालये करण्याचे नियोजन होते. पण, पुण्याच्या पालक न्यायाधीश रेवती ढेरे यांनी आणखी एक मजला वाढवण्याची सूचना केली होती. त्यानुसार तसा निर्णय घेतला असून न्यायसंकुलात एकूण ३६ न्यायालये करण्यात येणार आहेत,’’ अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी रविवारी (ता.२५) दिली.

मोरवाडी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे लोकार्पण न्यायमूर्ती मारणे आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या हस्ते; तर पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या वेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे चेअरमन ॲड. हर्षद निंबाळकर, सदस्य उदय वारुंजीकर, राजेंद्र उमाप, अहमद खान पठाण, विठ्ठल कोंडे देशमुख, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष गौरव वाळुंज, माजी अध्यक्ष व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
येथे नव्याने सुरू झालेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश म्हणून संध्या नायर, तर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर म्हणून दीपक डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली. मारणे म्हणाले, ‘‘पिंपरीत स्वतंत्र ‘मोटर वाहन न्यायालय’ व ‘कौटुंबिक न्यायालय’ स्थापन करण्याची मागणी आहे. याचाही गांभीर्याने विचार करण्यात येत असून, त्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल.’’

आरिफ डॉक्टर म्हणाले, ‘‘पिंपरीत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू झाल्यामुळे आता नागरिकांना पुणे येथील न्यायालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे वेळेची बचत, आर्थिक दिलासा आणि मानसिक ताणात कमी होऊन वेळेत न्याय मिळण्यास मदत होणार आहे. तसेच वकील वर्ग व न्यायालयीन कर्मचारी यांच्यासाठीही कामकाज अधिक सुसूत्र, कार्यक्षम आणि सुव्यवस्थित होणार आहे. मोशीचे न्यायसंकुल लवकर सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.’’

या कार्यक्रमाचे आयोजन न्यायालयीन अधिकाऱ्यांसमवेत बार असोसिएशन उपाध्यक्ष अनिल पवार, सचिव उमेश खंदारे, महिला सचिव रिना मगदुम, शंकर घंगाळे, सदस्य संकेत सरोदे, विकास शर्मा, मानसी उदासी यांनी केले. सूत्रसंचालन न्यायाधीश तेजस्वीनी महाडिक, गौरी औटी यांनी केले. तर संध्या नायर यांनी आभार व्यक्त केले.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com