फुगे विक्रेता मुलगा ट्रकच्या धडकेत जखमी
पिंपरी, ता. २५ : भरधाव ट्रकने धडक दिल्याने फुगे विक्रेता सोळावर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. रविवारी (ता. २५) सकाळी दहाच्या सुमारास माणमध्ये ही दुर्घटना येथे घडली. विशाल कुमार (वय १६, रा. माण) असे मुलाचे नाव आहे. ट्रकचे चाक त्याच्या पायावरून गेले. हिंजवडी पोलिसांनी ट्रक चालक पिंपळेश्वर बापू ननावरे (रा. कळंबोली) याला ताब्यात घेतले आहे. विशाल रस्त्यालगत फुगे विकत होता. त्याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

