देशभक्तीपर गीतांनी गुंजले शाळांचे प्रांगण

देशभक्तीपर गीतांनी गुंजले शाळांचे प्रांगण

Published on

पिंपरी, ता. २७ : प्रजासत्ताक दिनानिमित्त शहर-उपनगरांतील शाळांच्या प्रांगणात ध्वजवंदन, देशभक्तीपर गीतांचा निनाद, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी आणि नृत्यांद्वारे भारतीय संस्कृती आणि राष्ट्रप्रेम सादर करत राष्ट्रप्रेम, एकता आणि संविधान मूल्यांचे दर्शन घडले, ज्यामुळे शाळा परिसर देशभक्तीच्या भावनेने भारून गेला. नाट्य सादरीकरणांनी विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शाळेचे प्रांगण टाळ्यांच्या कडकडाटात आणि विद्यार्थ्यांच्या जयजयकाराने दुमदुमले.


आनंद ऋषीजी इंग्लिश मीडियम स्कूल
आचार्य श्री आनंद ऋषीजी इंग्लिश मीडियम स्कूल व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसालिया मॉन्टेसरी स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. विद्यार्थी शिक्षक वृंद व उपस्थित पालक यांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत गायले. आरएसपी पथकाच्या संचलनाने राष्ट्रध्वजाला मानवंदना अर्पण करण्यात आली.

सरस्वती भवन एज्युकेशन सोसायटी
श्री शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रशालेच्या प्रांगणामध्ये ढोल-ताशांच्या गजरात लेझीम नृत्य सादर करत प्रभातफेरी काढण्यात आली. संस्थेचे संस्थापक सचिव संभाजीराव शिरसाट यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. पांडाभाऊ साने यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे यावेळी सामुदायिक वाचन करण्यात आले.

एच.ए .स्कूल माध्यमिक विभाग
एच.ए स्कूल माध्यमिक विभाग प्रशालेत तिरंगी ध्वजास मानवंदना देऊन एनसीसी ,स्काऊट गाईड ,
आर एस पी च्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. विद्यार्थ्यांकडून भारताचे संविधान उद्देशिका वाचन केले. असाक्षरमुक्त गाव प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून म्हणून घेण्यात आली. तसेच साधन कवायत उभे व बैठे प्रकार सादर केले. बालचमुंनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. तसेच पाचवी ते सातवीच्या वर्ग शिक्षकांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज ,भारतीय सण, विविधतेत एकता या विषयावर हस्तलिखितांचे प्रकाशन प्रमुख पाहुण्या नीरजा सराफ यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. शालाप्रमुख दर्शन कोरके, कपिल पाटील, स्मिता झेंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

शिस्तबद्ध संचलनातून मानवंदना
श्री फत्तेचंद जैन विद्यालय, सौ.ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला, श्री बांठिया प्राथमिक जैन विद्या मंदीर, सेठ श्री पन्नालाल लुणकरण लुंकड वसतिगृह व श्री गुरु गणेश बालक मंदिर प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांनी सर्वांग सुंदर कवायत प्रकार व साधन कवायत प्रकारांचे संगीताच्या तालावर सादरीकरण केले. आरएसपी, गर्ल गाईड, स्काऊट पथक, कब बुलबुल पथक, बनी टमटोला पथकांनी शिस्तबद्ध संचलन करून मानवंदना दिली.


श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा
श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा कनिष्ठ महाविद्यालय व श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर, श्री आदर्श शिशुविहार चिंचवड स्टेशन या विभागामध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करत सर्वांना साक्षरतेची शपथ देण्यात आली.

कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालय
विद्यालयाने भारतमातेचा जयघोष करत प्रभातफेरी काढली. नूतन शिक्षण संस्थेचे सचिव चंद्रशेखर पाटील, राजाभाऊ गोलांडे, निवृत्त भारतीय नौदल पोलीस रामसिंह संघा, ॲड. पौर्णिमा जाधव, उज्वला चौधरी, सखाराम पाटील यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. सूत्रसंचालन विद्या सोनवणे यांनी केले. शीतल गायकवाड व उज्ज्वला चौधरी यांनी करून परिचय करून दिला.


श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय
वडमुखवाडी येथील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात एम.सी.सी. संचलनाद्वारे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. ‘वंदे मातरम्’ गीताचे गायन विद्यालयातील विद्यार्थिनींनी केले.


श्री गुरुमैय्या प्रभाकंवरजी शिशुविहार
श्री गुरुमैय्या प्रभाकंवरजी शिशुविहार व प्राथमिक विद्यामंदिरात कब बुलबुल संचलन करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. साधन कवायत व सामुदायिक कवायत, गीतगायन, देश भक्तीपर गीत आणि कराटे प्रात्यक्षिक अशी विविध गुणदर्शने विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून भारतमातेचा गौरव केला.


श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यामिक वि‌द्यालय
आकुर्डी येथील श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यामिक वि‌द्यालयात प्रा. डॉ. गोविंद दाभाडे, प्राचार्या संगीता गुरव, उप-प्राचार्य विजय बच्चे, पर्यवेक्षक संजय कांबळे, परशुराम रेंगडे यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. गणेश भोने यांनी उपस्थितांना ध्वज प्रतिज्ञेची शपथ दिली. विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले.

प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये पथसंचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘कला ग्रुप, पुणे’चे संस्थापक मनोजकुमार फुटाणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com