सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

सकाळ संवाद

जॉगिंग ट्रॅकच्या भितींवरील सुरक्षा जाळी तुटली
गंगानगर प्राधिकरण निगडी सेक्टर नंबर २८ येथील इको जॉगिंग ट्रॅक येथे भितींवरील सुरक्षा जाळी तुटलेली आहे. त्यामुळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणात परिसरात कचरा टाकत आहेत. याबाबत आम्ही पालिका प्रशासनानडे २०२५मध्ये तक्रार केली होती. पण, त्यावर अजूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. या ठिकाणी सकाळ-सायंकाळ ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण फेरफटका, व्यायाम करण्यासाठी येत असतात. त्यांच्या आणि परिसराच्य सुरक्षेसाठी ही जाळी सुव्यवस्थित करणे आवश्यक आहे.
- सिराज शेख, निगडी
PNE26V89836

जुनी सांगवी परिसरात अतिक्रमणे
जुनी सांगवी पोलिस चौकीच्या वळणावर फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. या विक्रेत्यांमुळे कायम वाहतूक कोंडी होत असते. महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाला येथील नागरिकांनी अनेकदा सूचना केल्या. फोनवर संपर्क करुन तक्रार केली; परंतु तात्पुरती कारवाई करण्यात येते. त्यानंतर पुन्हा हे विक्रेते या ठिकाणी व्यवसाय करतात. यामुळे पादचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला वैतागले आहेत. प्रशासन- लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात. त्यामुळे नक्की तक्रार कोठे करायची? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE26V89834

चिंचवडगाव परिसरात अतिक्रमणे
चिंचवडगाव परिसरात मोरया गोसावी मंदिर रस्ता, तसेच लगतच्या पदपथावरून चालणेही कठीण होत आहे. ‘नो पार्किंग’च्या जागेवर दुचाकी, रिक्षा वाटेल तशा उभ्या केलेल्या असतात. तसेच भाजीपाला विक्रेते व इतर साहित्य विक्रेते पदपथावर व्यवसाय थाटतात.त्यामुळे स्थानिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. अतिक्रमण निर्मूलनासाठी पालिकेचे पथक येते व तात्पुरती कारवाई करून जाते. त्यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी कारवाई करावी.
-भालचंद्र परब, चिंचवडगाव
PNE26V89834

बिजलीनगरच्या कंपाउंडकडून जाताना चिंचवडेनगर मार्गावर जुन्या रेफ्रिजरेटरचे दोन सांगाडे पडले आहेत. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दखल घेऊन ते योग्य ठिकाणी जमा करावेत. काही नागरिकांना ई-वेस्ट संकलन मोहिमेची माहिती नसेल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याची माहिती सर्वत्र पोहचविणे आवश्यक आहे.
-इंद्रजीत चव्हाण, बिजलीनगर
PNE26V89840

मोरवाडी चौकात अनधिकृत वाहनतळ
मोरवाडी चौकात एका कापड दुकानासमोर ‘बीआरटी’ बस स्टॉपवर जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी वाहने उभी केलेली असतात. त्यांच्यावर कारवाई का होत नाही? वाहतूक पोलिस या प्रकाराकडे दुर्लक्ष का करत आहेत.
-सचिन ताम्हाणे, मोरवाडी
PNE26V89841

चिंचवड परिसरात कचऱ्याचे ढीग
चिंचवडगाव, पवनानगर, बिजलीनगरकडून चिंचवडेनगर मार्गावर कचऱ्याचा नेहमी ढीग पडत असतो. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी या स्थितीवर मार्ग काढावा. तसेच हा रस्ता नेहमी स्वच्छ राहण्यासाठी जनजागृती करावी.
-इंद्रजीत चव्हाण, चिंचवडगाव
PNE26V89838

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com