स्वयंसेवी संस्था, सोसायट्यांत विविध कार्यक्रम

स्वयंसेवी संस्था, सोसायट्यांत विविध कार्यक्रम

Published on

पिंपरी, ता. २७ ः शहरातील विविध शासकीय कार्यालये, सहकारी सोसायट्या, गृहनिर्माण सोसायट्या, राजकीय पक्ष कार्यालये आणि समाजसेवी संस्थांच्या कार्यालयांच्या प्रांगणात सोमवारी (ता. २६) ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, सैनिकांचा सन्मान सोहळा, बक्षीस वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठांसह, लहान मुलांनी या मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता.

प्रेम मन्नत सोसायटी
चऱ्होलीतील प्रेम मन्नत सोसायटीच्या प्रांगणात ध्वजवंदन झाले. यावेळी सर्व नागरिक आणि मुलांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. लहान मुलांनी देशभक्तिपर गीते आणि भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

ऐश्वर्यम मेलडी सोसायटी
रावेतमधील ऐश्वर्यम मेलडी सोसायटीतील विविध क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलांना ज्येष्ठांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

कामगार कल्याण मंडळ
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संत तुकारामनगर येथील कार्यालयात देशभक्तिपर गीतांवर नृत्य कार्यक्रम झाला. लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव शिर्के यांनी ध्वजवंदन केले.

सोहम सार्वजनिक ग्रंथालय
संत तुकाराम नगर पिंपरी येथील सोहम सार्वजनिक ग्रंथालयात संत तुकाराम नगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

आरटीओ

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले.

निगडी पोलिस चौकी
निगडी प्राधिकरण पोलिस चौकीत वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेश बनसोडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. याप्रसंगी सायकल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या स्वयंसेवकांना प्रशस्तिपत्रके देण्यात आली.


वुई टुगेदर फाउंडेशन
वुई टुगेदर फाउंडेशनने सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. चिंचवडमधील यशस्वी क्लासेसच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.  भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन, तिरंगा ध्वजास सलामी, राष्ट्रगीत गायन झाले. वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

साकोसा जिल्हा मित्र मंडळ
साकोसा जिल्हा मित्र मंडळाने रक्तदान शिबिर घेतले. यावेळी १२३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सातारा जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष गोपीचंद जगताप आदी उपस्थित होते.

आयसीएआय शाखा
भारतीय सनदी लेखाकार (आयसीएआय) संस्थेच्या पिंपरी चिंचवड शाखेत शाखा अध्यक्ष वैभव मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com