प्रवीण तुपे प्रतिक्रिया
सायन्स पार्कविषयी अजित पवार विशेष दक्ष होते. उद्घाटनाला ते आवर्जून उपस्थित होते. येथील तारांगणचे भूमिपूजन त्यांनीच केले होते. शहरात महापालिकेच्या विकासकामांसोबत शहराची सांस्कृतिक व शैक्षणिक भूकही भागवली गेली पाहिजे या मताचे ते होते. बारामतीतील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी सायन्स पार्कला भेट देण्यासाठी प्रोत्साहित केले होते. याशिवाय कामाच्या बाबतीत प्रशासकीय अधिकाऱ्यांचा विचार करणारे, त्यांना मदत करणारे, लहान गोष्टींचाही विचार करणारे असे राजकारणी होते. पाणीपुरवठा विभागाचा मी प्रमुख होतो तेव्हा त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पाण्याचे दर वाढविण्याबाबत मला विचारणा केली होती. शहराची आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. चुकीच्या गोष्टींना ते थारा देत नसत. त्यामुळे त्यांचा प्रशासनावर वचक होता.
- प्रवीण तुपे, संचालक, सायन्स पार्क तसेच निवृत्त अतिरिक्त आयुक्त
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

