पिंपरी-चिंचवड
रस्टन कॉलनीत आरोग्य तपासणी शिबिर
पिंपरी, ता. २९ ः रस्टन ग्रीव्हज औद्योगिक कामगार सहकारी वसाहत आणि रमामंगल फाउंडेशनच्या वतीने रस्टन कॉलनी येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये साखर, हिमोग्लोबिन, युरिक अॅसिड, कॅल्शिअम, कोलेस्टेरॉल, टीएसएच, एचबीए1सी अशा तपासण्या करण्यात आल्या. या वेळी रस्टन ग्रीव्हज औद्योगिक कामगार सहकारी वसाहतीचे अध्यक्ष दादा पवार, सचिव विलास कंक, खजिनदार अनिल कदम, कैलास काकडे, रमा मंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष सौंदणकर, सुमित कांबळे, खजिनदार गणेश ओगले, फिरोज खान, प्रशांत शेनॉय, संतोष मोरजकर, चिन पाटील, क्रांती काळे आदी उपस्थित होते. डॉ. लाल पॅथलॅब यांचे सहकार्य लाभले.
---

