मोशी कृषी उपबाजारात गुरुवारी शुकशुकाट

मोशी कृषी उपबाजारात गुरुवारी शुकशुकाट

Published on

पिंपरी, ता. २९ ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे गुरुवारी (ता. २९) मोशी उपबाजार समितीचे दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले. त्यामुळे बाजारात शुकशुकाट होता.
पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध संघटनांनी बंदची हाक दिली होती. राज्य शासनानेही तीन दिवस दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वच शासकीय कार्यालयातील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. मोशी उपबाजार समितीही बंद ठेवण्याचा निर्णय उपबाजार समिती प्रशासनाने घेतला. शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीस आणू नये. तसेच खरेदीदारांनी खरेदीस येऊ नये असे आवाहन बाजार प्रशासनाने केले होते. मात्र, शेतकऱ्यांपर्यंत बंदची माहितीच पोहोचली नसल्यामुळे अनेक शेतकरी शेतीमाल घेऊन मोशी उपबाजार समितीत आले होते. मोठ्या प्रमाणात फळे, भाजीपाल्याचे ट्रक बाजारात आले. पण, उपबाजार समिती बंद असल्यामुळे आतमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले नाहीत. मात्र शेतकऱ्यांनी फळे व भाजीपाला उपबाजार समितीबाहेर विक्रीसाठी ठेवला होता. त्यामुळे आतमध्ये शुकशुकाट होता, तर बाहेर नागरिकांची वर्दळ होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com